Monday, May 27, 2024
Homeनगरस्थायी समिती : महापौरांच्या वार्डाला पसंती, प्रदेशकडून आली नावं

स्थायी समिती : महापौरांच्या वार्डाला पसंती, प्रदेशकडून आली नावं

अहमदनगर (प्रतिनिधी) –

महापालिकेच्या स्थायी समितीत कोणाला पाठवयाचा यावरून सगळ्याच राजकीय पक्षात नाराजीनाट्य झाले. पण महापौर बाबासाहेब वाकळे यांनी

- Advertisement -

नाराजीनामा मोडून काढत आपल्याच वार्डातील दोघांना स्थायी समितीत पाठविले. अर्थात त्यासाठी शहरजिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, आणि गटनेत्या मालनताई ढोणे यांची साथ मिळाली.

भाजपने थेट प्रदेश पातळीवरून नवनियुक्त सदस्यांची नावे कळवित त्यांनाच स्थायी समितीत संधी देण्यात आली. गटनेत्या तथा उपमहापौर मालनताई ढोणे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. शहर भाजपांतर्गत दोन गट सर्वश्रृत असले तरी महापालिकेत महापौर बाबासाहेब वाकळे आणि उपमहापौर ढोणे, शहरजिल्हाध्यक्ष भैय्या गंधे हे स्वतंत्ररित्या निर्णय घेत असल्याचे आजवर दिसून आले.

कालही या तिघांची बैठक झाली. या बैठकीत वंदना ताठे आणि रविंद्र बारस्कर यांची नावे निश्‍चित करत ती प्रदेश भाजपकडे पाठविण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याच नावाला मंजुरी दिल्यानंतर ताठे, बारस्कर यांची स्थायी समितीत वर्णी लागल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. स्थायी समितीत नियुक्त झालेले ताठे आणि बारस्कर हे दोघेही नगरसेवक महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याच वार्डातील आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या