Tuesday, May 28, 2024
Homeनाशिकजाईंट फार्मिंगसाठी उमेद्वारी अर्ज भरण्यास प्रारंभ

जाईंट फार्मिंगसाठी उमेद्वारी अर्ज भरण्यास प्रारंभ

पिंपळगाव बसवंत । वार्ताहर | Pimpalgaon Basvant

पिंपळगाव सोसायटीच्या (Pimpalgaon Society) निवडणुकीचा (election) धुराळा खाली बसतो ना बसतो तोच येथील जॉईंट फार्मिंग सोसायटीसाठी (Joint Farming Society) 23 जुलै रोजी मतदान (voting) होवून निकाल जाहिर होणार आहे.

- Advertisement -

जॉईंट फार्मिंगसाठी आमदार दिलीप बनकर (MLA Dilip Bankar) व माजी सरपंच भास्कर बनकर यांच्या गटात सत्तेसाठी शह-काटशह रंगला आहे. दोन्ही गटाकडून अकरा जागांसाठी पॅनलची निर्मिती केली जात आहे.

मागील आठवड्यात पिंपळगाव सोसायटीच्या निवडणुकीतील सामना सर्वांनी अनुभवला. माजी सरपंच भास्कर बनकर यांनी आमदार बनकर गटाला जोरदार शह दिला. पिंपळगाव सोसायटीच्या निवडणुकीचे (election) कवित्व अद्याप संपलेले नसतांनाच जॉईंट फार्मिंग सोसायटीच्या (Joint Farming Society) निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. त्यासाठी दि.11 ते 24 जूनपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असून 27 जूनला अर्ज छाननी तर 12 जुलैला अर्ज माघारीची अंतिम मुदत देण्यात आली आहे. तर 23 जुलै रोजी मतदान (voting) होवून मतमोजणी होणार आहे.

11 जागांसाठी सर्वसाधारण 6, महिला राखीव 2, अनु. जाती-जमाती 1, इतर मागास प्रवर्ग 1, भटके विमुक्त 1 अशा याप्रमाणे 11 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. जॉईंट फार्मिंग सोसायटीवर सध्या आमदार दिलीप बनकर यांच्या गटाची सत्ता आहे. संस्थेच्या जमीन वाटपाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याने निम्म्या सभासदांचे राजीनामे झाले आहेत.

संस्थेचे कामकाज आता औपचारिकता राहिल्याने इच्छुकांना या संस्थेचे प्रतिनिधीत्व करण्यात किती स्वारस्य आहे हाही प्रश्न आहे. 474 मतदार असलेल्या या संस्थेच्या निवडणुकीसाठी माजी सरपंच भास्कर बनकर यांच्या गटाकडून चार उमेद्वारी अर्ज दाखल झाले आहेत. गतवेळी बिनविरोध झालेल्या जॉईंट फार्मिंग सोसायटीच्या निवडणुकीत बनकर द्वयींमध्ये तह होणार की निवडणूक होणार याबाबत पिंपळगाव बसवंत परिसरात उत्सुकता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या