Thursday, June 20, 2024
Homeजळगाववडिलांसह शालकाच्या मदतीने लुटली स्टेट बँक ; संशयितांकडून मुद्देमाल हस्तगत

वडिलांसह शालकाच्या मदतीने लुटली स्टेट बँक ; संशयितांकडून मुद्देमाल हस्तगत

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

- Advertisement -

लाचखोरीच्या प्रकरणात निलंबित त्यातच वर्षभरापासून वैद्यकीय रजेवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने बँकेत सफाई कर्मचारी असलेल्या शालकाला सोबत घेत बँकेत दरोडा टाकण्याचा प्लॅन रचला. या कटात उपनिरीक्षकाने आपल्या वडीलांना देखील सहभागी करुन घेत गुरुवारी स्टेट बँकेच्या शाखेतून 4 कोटींचा ऐवज लुटून नेला. परंतु पोलिसांना चौकशीत सफाई कर्मचारी आणि मॅनेजरच्या हकीकतमध्ये तफावत आढळल्याने त्यांनी सफाई कर्मचार्‍याला खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्यानुसार एलसीबी आणि शनिपेठ पोलिसांनी 48 तासात हा गुन्हा उघड करीत तिनही संशयिताच्या मुसक्या आवळल्या.

शहरातील कालिंका माता चौफुलीजवळ असलेल्या स्टेट बँकेच्या शाखेत गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास हेल्मेट घालून आलेल्या दोन इसमांनी दरोडा टाकला. बँकेतील कॅश इंचार्ज, सफाई कर्मचारी व सुरक्षा रक्षकाला बांधून ठेवत त्यांच्या तोंडाला चिकट पट्टी बांधून बँकेच्या दोन तिजोरींमध्ये ठेवलेेली 17 लाखांची रोकड आणि सोने असा एकूण 4 कोटी रुपयांचा ऐवज घेवून चोरटे पसार झाले. दरोडा टाकत असतांना मॅनेजन राहुल महाजन यांची दरोडेखोरांसोबत झटापट झाल्याने दरोडेखोरांनी बँक मॅनेजरच्या मांडीवर चाकूने वार करुन त्यांची दुचाकी घेवून ते पसार झाले. तसेच बँकेतील कर्मचारी नयन गिते यांच्यावर देखील वार केल्याने हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्यासह संपूर्ण पोलीस यंत्रणा हादरली होती. भरदिवसा झालेल्या जबरी चोरीची उकल करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले होते.

2021 पासून पोलीस उपनिरीक्षक होता वैद्यकीय रजेवर

पोलीस उपनिरीक्षक शंकर जासक हा पोलीस दलात भरती झाल्यानंतर तो परीक्षा देवून पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली. परंतु लाचलुचतप प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याच्यावर कारवाई केल्यामुळे त्याला निलंबित केले होते. मात्र काही वर्षानंतर त्याला पुन्हा सेवेत रुजु करण्यात आले होते. परंतु ऑक्टोबर 2021 पासुन वैद्यकीयरजेवर असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे.

एलसीबीसह शनिपेठ पोलिसांची संयुक्त कारवाई

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार, सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी आणि आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या पथकातील पीएसआय चांदलकर, पोलीस उपनिरीक्षक मुबारक तडवी, पोलीस हेडकॉन्स्टेबल परिस जाधव, राहुल पाटील, अनिल कांबळे, राहुल घेटे, विजय निकम, किरण वानखेडे, मुकुंदा गंगावणे, अमोल विसपुते, गिरीश पाटील, आश्विन हडपे, अभिजीत सैंदाणे, सुनील पवार, इंगळे यांच्या पथकाने केली.

15 दिवसांपूर्वी रचला दरोड्याचा प्लॅन

मनोज सुर्यवंशी हा स्टेट बँक ऑफ इंडीया कालंका माता जवळील शाखेत ऑफिस बॉय म्हणून करार पध्दतीने नोकरीस होता. तो बँकेतील व्यवहारांबाबत आपले पाहुणे शंकर जासक यांना वेळोवेळी माहिती देत होता. त्यातूनच पोलीस उपनिरीक्षक असलेल्या शंकर जासक यांनी शालक व आपल्या वडीलांच्या मदतीने पंधरा दिवसांपुर्वी बँकेत दरोडा टाकण्याचा प्लॅन रचला. त्यानुसार काही दिवस रेकी देखील करण्यात आली होती.

पोलीस उपनिरीक्षकाला बडतर्फ करण्याची मागणी

पोलीस उपनिरीक्षक शंकर जासक याच्याकडून चोरीतील 3 कोटी 60 लाखांचे सोने आणि 16 लाख 40 हजारांची रोकड हस्तगत केली आहे. उर्वरित 70 हजार रुपये हस्तगत करणे अद्याप बाकी आहे. त्याला यावपुर्वी लाच घेतांना निलंबित केले असून त्यानंतर वर्षभरापासून तो वैद्यकीय रजेवर आहे. पोलीस महासंचालकांनी रायगड पोलीस अधीक्षकांना शंकर जासक याला बडतर्फ करण्याची सूचना केली आहे.

धागेदोरे मिळताच तपासाला वेग

बँकेतील सफाई कर्मचारी मनोज सुर्यवंशी याने हा गुन्हा त्याचे पाहुणे पोलीस उपनिरीक्षक शंकर जासक व त्यांचे वडील रमेश जासक यांच्या मदतीने केल्याचे सांगितले. बँकेतील लुटलून नेलेले सोने हे व पैसे हे पाहुणे शंकर जासक हे त्यांचे घरी कर्जत येथे घेवून गेले असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी संशयितांच्या शोधार्थ संपुर्ण यंत्रणा कामाला लावली. वेगवेगळ्या पथकाने सर्व सीसीटिव्ही फुटेज आणि इतर वस्तू गोळा केल्यानंतर पोलिसांना संशयितांचा सुगावा लागला.

धागेदोरे मिळताच तपासाला वेग

बँकेतील सफाई कर्मचारी मनोज सुर्यवंशी याने हा गुन्हा त्याचे पाहुणे पोलीस उपनिरीक्षक शंकर जासक व त्यांचे वडील रमेश जासक यांच्या मदतीने केल्याचे सांगितले. बँकेतील लुटलून नेलेले सोने हे व पैसे हे पाहुणे शंकर जासक हे त्यांचे घरी कर्जत येथे घेवून गेले असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी संशयितांच्या शोधार्थ संपुर्ण यंत्रणा कामाला लावली. वेगवेगळ्या पथकाने सर्व सीसीटिव्ही फुटेज आणि इतर वस्तू गोळा केल्यानंतर पोलिसांना संशयितांचा सुगावा लागला.

कुसुंब्याला दुचाकी सोडून रेल्वेने फरार

बँक लुटल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक शंकर जासक याने मॅनेजरची दुचाकी कुसुंबा बस स्थानकाजवळ लावून वडीलांना तेथेच सोडले. त्यानंतर तो बँकेतून लुटलेले सोने आणि रोकड घेवून भुसावळ रेल्वे स्थानकावर गेला आणि तेथून रेल्वेने कर्जत येथे निघून गेल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे.

हकिकतमध्ये तफावत आढळल्याने अडकला जाळ्यात

पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत, परिरक्षावधीन उप विभागीय पोलीस अधिकारी सतिष कुलकर्णी, परि उप विभागीय पोलीस अधिकारी, आप्पासाहेब पवार, एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजनपाटील, शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शंकर शेळके यांनी बँकेतील कर्मचारी व जखमी बँक मॅनेजर यांची वेगवेगळी विचारपूस केली. बँकेतील स्टाफ तसेच फिर्यादी व मनोज सुर्यवंशी हा पोलिसांना सांगितलेल्या हकीकतमध्ये तफावत आढळून येत असल्याने पोलिसांचा सफाई कर्मचारी मनोजवर संशय वाढला. त्याला खाक्या दाखवितात त्याने घटनेची कबुली दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या