Monday, November 25, 2024
Homeनगरराज्य नाट्य स्पर्धा 2022 : राणी-मुंग्याचं ‘वारूळ’

राज्य नाट्य स्पर्धा 2022 : राणी-मुंग्याचं ‘वारूळ’

संदीप जाधव | 9225320946

अनाठायी महत्त्वाकांक्षेपोटी केलेले अनैतिक कृत्य स्वतःच्याच घातास कारणीभूत ठरते. हा विषय घेऊन श्रीरामपूरच्या कर्णेज अ‍ॅकेडमीने राज्य नाट्य स्पर्धेत ‘वारूळ’ हे दोन अंकी नाटक सादर केले. तीनच पात्र असलेल्या या नाट्यकृतीने निर्माण केलेल्या सस्पेन्सने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. मात्र, अनेक प्रसंगांची गुंतागुंत असल्याने प्रेक्षकांना संभ्रमात टाकले. मात्र, कलाकारांनी प्रसंगांना परिणामकारकपणे सादर करण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचे दिसले. सस्पेन्स निर्माण करण्यात दिग्दर्शक मात्र यशस्वी झाले.

- Advertisement -

राज्य नाट्य स्पर्धा 2022 : ‘एका उत्तराची कहाणी’

डॉ. राजेंद्र पोळ यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन नवनाथ कर्डिले यांनी केले. पात्रांची संख्या कमी असल्याने नाट्याला फुलविण्याची जबाबदारी तीनही कलकारांवर होती. ती त्यांनी त्यांच्या परीने चांगली करण्याचा प्रयत्न केला. राणी व मुंग्या या पात्राने ‘वारूळा’ला चांगलेच बहरवले.

वैद्यकीय व्यवसाय करतानाच राजकारण्यांशी संबंध ठेवणार्‍या डॉ. काल्याचे राणी या महिले शी संंबंध असतात. तिचा पती मुंगा डॉ. काल्या यांना ब्लॅकमेल करत असतो. गुंड प्रवृत्तीच्या मुंग्याचा वापर डॉक्टर आपला राजकीय डाव साधण्यासाठी करतो. मात्र, मुंग्या आणि राणी केवळ पैशांसाठी काम करत असतात. या दोघांचाही वापर करून घेतल्यानंतर मुंग्यालाच संपविण्याच्या बेतात असलेल्या डॉ. काल्याचा काटा राणी काढते.

राज्य नाट्य स्पर्धा 2022 : ‘परफेक्ट बायको कशी शोधावी?’

डॉ. काल्या पात्राला दिप्तेश विसपुते यांनी सादर केले. पहिल्या अंकात कृत्रिम वाटणारा त्यांचा अभिनय दुसर्‍या अंकात भलताच फुलला.

जिया अल्वले हिने राणी या पात्राला आपल्या अदाकारीने चांगलेच रंगवले. कधी कामूक, कधी चिंताग्रस्त तर कधी मुरब्बीपणा असे विविध पैलू तिने छानपणे हाताळले. तिची देहबोलीही कमालीची सकारात्मक होती. अनेक प्रसंगांमध्ये तिने जान आणली. ती एकदाही डगमगली नाही.

पहिल्या प्रसंगांपासून ज्याच्यामुळे नाटकाची दिशा समजत होती त्या मुंग्याचे पात्र विनोद वाघमारे यांनी वठवले. सराईत गुंडाला शोभेल असेच त्यांचे संवाद होते. त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना हसवलेदेखील.

राज्य नाट्य स्पर्धा 2022 : ‘आघात’ नेमका कुणावर?

नाटकाचे निर्मितीप्रमुख अ‍ॅड. प्रसन्ना बिंगी होते. नेपथ्याची जबाबदारी अशोक कर्णे व सौरभ संकपाळ यांनी सांभाळली. प्रकाश योजना प्रकाश ढोणे व अर्जून तिरमखे यांच्याकडे होती. अनेक प्रसंगांना त्यांनी चांगले उजळवले. शेवटच्या प्रसंगातील स्पॉट भलतेच भावले. एकदा मात्र लाईट उशिराने लागले.

मयूर वाकचौरे व अथर्व हरदास यांनी संगीत दिले. अनेक प्रसंगात त्यांनी समर्पक संगीत दिले असले तरी काही प्रसंगात उणीव भासली.

राज्य नाट्य स्पर्धा 2022 : ‘चाणक्य विष्णूगुप्त’

रेणुका अस्वले व प्रतीक मोढे यांनी रंगभूषा केली. त्यांनी राणी व मुंग्या छान रंगवला काजल गायकवाड व अभिजीत बोर्डे यांनी पात्रांची वेशभूषा सांभाळली. राणीचे प्रत्येक प्रसंगात वेगवेगळे मॉड कपडे होते. मुंग्याचाही वेष गुंडाला शोभेल असाच होता. या नाटकासाठी अजय घोगरे यांनी सहकार्य केले.

राज्य नाट्य स्पर्धा 2022 : रेंगाळलेलं ‘समांतर’

नाटकाच्या सादरीकरणासाठी दिग्दर्शक नवनाथ कर्डिले यांनी राणी व मुंग्याच्या भूमिकेकडे जास्त लक्ष दिल्याचे दिसले. नाटकातून चांगला संदेश देतानाच गचाळ राजकारणावरही बोट ठेवले. वैद्यकीय व्यवसाय असणार्‍या डॉक्टरांचा राजकारणाकडील ओढाही त्यांनी छानपणे दर्शविला. काही चुकाही झाल्या. अनैतिक कामे करणारी राणी व मुंग्या डॉक्टरला नैतिकतेचा डोस पाजतात हे खटकले. तसेच स्त्रीचा सन्मान करणारा मुंग्या स्वतःच्या पत्नीला मात्र बदनामीच्या दरीत का ढकलतो हेही उमगले नाही. पण कलाकारांनी सुंदर अभिनयाद्वारे प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले.

राज्य नाट्य स्पर्धा 2022 : छान ‘खेळ मांडियेला’राज्य नाट्य स्पर्धा 2022 : भावनांचा कल्लोळ अनाथ राज्य नाट्य स्पर्धा 2022 : मी पण नथूराम गोडसेच बोलतोय…

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या