Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याMaratha Reservation : राज्य सरकारचे शिष्टमंडळ घेणार मनोज जरांगे पाटलांची भेट;...

Maratha Reservation : राज्य सरकारचे शिष्टमंडळ घेणार मनोज जरांगे पाटलांची भेट; उपोषण सोडण्याची करणार विनंती

मुंबई | Mumbai

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरु केले आहे. आज (३० ऑक्टोबर) त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. काल दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘दोन दिवस मी बोलू शकतो, त्यामुळे दोन दिवसात काय बोलायचं ते बोला’, असे म्हणत सरकारला चर्चेसाठी येण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर आता सरकारने जरांगेंच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांचा जीव घ्यायचा आहे का? हंबरडा फोडत महिला आंदोलकाचा सरकारला सवाल

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज सरकारने एक शिष्टमंडळ जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. त्यानंतर आतापर्यंत सरकारने मराठा आरक्षणासाठी काय केलं याची माहिती जरांगे पाटलांना दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच यावेळी मनोज जरांगे पाटलांना उपोषण सोडण्याची विनंती देखील सरकारच्या वतीने करण्यात येणार असल्याचे समजते.

Maharashtra News : सुप्रिया सुळे-जयंत पाटील घेणार राज्यपाल रमेश बैस यांची भेट; कारण काय?

दरम्यान, आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण उपसमितीची महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत काय निर्णय होतो याकडे संपूर्ण मराठा राज्याचे लक्ष लागले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Maratha Reservation : ” ‘माझा आवाज चालू आहे, तोपर्यंत…”; मनोज जरांगे पाटलांचे सरकारला आवाहन

- Advertisment -

ताज्या बातम्या