Saturday, November 23, 2024
Homeक्रीडाराज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा : औरंगाबाद, उस्मानाबाद निर्णायक तर नाशिकची आघाडी

राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा : औरंगाबाद, उस्मानाबाद निर्णायक तर नाशिकची आघाडी

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकमध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या (इन्विटेशन लीग), दोन दिवसीय कसोटी सामन्यात, औरंगाबाद ने ओम मोगल च्या शतकाच्या (107 ) जोरावर व उस्मानाबाद नी अनुज म्हस्के व आदित्य मोरे च्या गोलंदाजी मुळे निर्णायक विजय, तर नाशिक ने कर्णधार आयुष ठक्करच्या अष्टपैलू कामगिरीने – आठव्या क्रमांकावर फलंदाजी करत 66 धावा व एकूण 4 बळी – पहिल्या डावातील आघाडी वर विजयी गुण मिळविले.

- Advertisement -

14 वर्षांखालील वयोगटात, 3 विविध मैदानांवर  हे सामने खेळविण्यात आले. हे सामने  महात्मा नगर क्रिकेट मैदानावर खेळविण्यात येत आहेत.

युनायटेड, पुणे विरुद्ध नाशिक सामन्यात नाशिक नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. युनायटेड पहिला डाव सर्वबाद 96 धावांवर आटोपला. या सामन्यात  सौमिल दाभोळकर 29, हर्षवर्धन तिंगरे 24 यांनी धावांचे योगदान दिले. तर नाशिकच्या प्रसाद दिंडे  याने भेदक गोलंदाजी करत 5 बळी टिपले. आयुष ठक्करला 3 तर हुजेफ शेख 2 बळी मिळाले.

मैदानात उतरलेल्या नाशिक संघाचा पहिला डाव सर्वबाद 171 धावांवर आटोपला. या सामन्यात नाशिकच्या आयुष ठक्करने  66 धावांची खेळी केली तर यश पगार 27, समकीत सुराणा 19 यांनी धावांचे योगदान दिले.

या सामन्यात पुण्याच्या सोहम कांबळेने 4 बळी टिपले तर आर्यमन चौहानने 2 बळी टिपले. युनायटेडचा दुसरा डाव – 7 बाद 184 धावांवर असताना सामना अनिर्णीत झाला. नाशिकने या डावात आघाडी घेतल्याने या सामन्यात नाशिकला आघाडीचे गुण मिळाले.

दुसरा सामना हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे एम सी व्ही एस पुणे विरुद्ध औरंगाबाद  खेळविण्यात आला. या सामन्यात एम सी व्ही एस नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती.

या सामन्यात एम सी व्ही एस पहिला डाव सर्वबाद 83 धावांवर आटोपला. या  सामन्यात  रेहान मंसुरी 30 धावांचे योगदान दिले. औरंगाबादकडून श्रीनिवास लेहेकर व ओम मोगल प्रत्येकी 3 बळी टिपले.

तद्नंतर मैदानात उतरलेल्या औरंगाबाद संघाचा पहिला डाव 6 बाद 273 धावांपर्यंत पोहोचला. या सामन्यात ओम मोगल  याने शतक साजरी केले. त्याने 107 धावा चोपल्या.

या सामन्यात साहिल गोपालघारेने 2 बळी घेतले. एम सी व्ही एस दुसरा डाव 153 धावांत आटोपला. या सामानाय्त  अथर्व भोसले 47, पार्थ बागडी 33, नुमान शेख 4 तर राज भोसले व श्रीनिवास लेहेकर प्रत्येकी 2 बळी टिपले. या सामन्यात औरंगाबादचा 1 डाव आणि 37 धावांनी विजय झाला.

तिसरा सामना सय्यद पिंपरी क्रिकेट मैदानावर रत्नागिरी विरुद्ध उस्मानाबाद यांच्या खेळविण्यात आला. या सामन्यात रत्नागिरीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. यात रत्नागिरीचा पहिला डाव 72 धावांत आटोपला.

या सामन्यात अनुज म्हस्के 4, भूषण जाधव 3 व सिध्हांत गिरी 2 बळी घेतले. उस्मानाबादचा पहिला डाव  96 धावांत आटोपला. या सामन्यात प्रदुम्न धोंड 39 व  आर्यन देशमुखने 22 धावांची खेळी केली.

तर अंकित वझेने 5 तर हर्षद कांबळे 4 बळी टिपले. तद्नंतर रत्नागिरी दुसरा डाव 61 धावांत आटोपला. या सामन्यात आदित्य मोरे 5, भूषण जाधव 2 तर अनुज म्हस्के 1 बळी टिपले. या सामन्यात उस्मानाबादने 9 गडी राखून विजय संपादन केला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या