Saturday, October 12, 2024
Homeजळगावहवामान बदलावर विद्यापीठात आज राज्यस्तरीय वेबीनार

हवामान बदलावर विद्यापीठात आज राज्यस्तरीय वेबीनार

जळगाव jalgaon

 कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग (Department of Mass Communication and Journalism) आणि युनिसेफ (UNICEF)  यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दि. 16 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेदरम्यान ‘हवामान बदल’ (‘climate change’) या विषयावर राज्यस्तरीय वेबिनारचे (State Level Webinar) आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

वेबिनारचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र- कुलगुरु प्रा.डॉ.एस.टी.इंगळे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला व मानव्यविद्या प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ. अनिल चिकाटे हे राहणार असून पुणे येथील सेंटर फॉर एन्व्हारमेंट एज्युकेशनचे प्रोग्राम डायरेक्टर सतिश आवटे मार्गदर्शन करणार आहेत.

वेबिनारचे मुख्य आयोजक विभागप्रमुख प्रा.डॉ. सुधीर भटकर, युनिसेफच्या संवाद विशेषतज्ज्ञ स्वाती मोहपात्रा, माध्यम सल्लागार श्रुती गणपत्ये तर सहआयोजक डॉ.विनोद निताळे, डॉ.गोपी सोरडे,  डॉ.सोमनाथ वडनेरे हे  आहेत.

हा राज्यस्तरीय वेबिनार झूम अॅपवर घेण्यात येणार आहे. वेबिनार सर्वासाठी नि:शुल्क असून यात सहभागी होण्यासाठी झूम आयडी 9423490044 व mcj111 हा पासवर्ड वापरून लॉगिन करता येईल. वेबिनारमध्ये सहभागी  होण्याचे आवाहन मुख्य आयोजक तथा विभागप्रमुख प्रा.डॉ. सुधीर भटकर यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या