Sunday, May 26, 2024
Homeमुख्य बातम्याराज्य मराठा क्रांती मोर्चाची आज बैठक

राज्य मराठा क्रांती मोर्चाची आज बैठक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मराठा आरक्षण व इतर प्रलंबित मागण्यांवर दिशा ठरविण्यासाठी राज्य मराठा क्रांती मोर्चाची आज बैठक होणार आहे.

- Advertisement -

आज सकल मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांची राज्यस्तरीय बैठक बोलविण्यात आली आहे.

शनिवारी (दि.26)औरंगाबाद रोड येथील मधुरम बँक्वेट हॉल, निलगिरी बाग येथे महत्वाची बैठक होणार आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर समाजात उफाळून आलेला असंतोष लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने काही निर्णय जाहीर केले आहेत.

या निर्णयावरही समाजाच्या विविध थरांतून वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटत आहेत.सामान्य मराठा या संमिश्र प्रतिक्रीयांमुळे संभ्रमीत झाला असून मराठा आंदोलनाची दिशा भरकटू नये म्हणून हा संभ्रम दूर होणे आवश्यक आहे. पार्श्वभूमीवर आज सकल मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांची राज्यस्तरीय बैठक बोलविण्यात आली आहे.

सकाळी 10 ते सायंकाळी 4 या कालावधीत होणार्‍या बैठकीत समाजातील ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासक,कायदे तज्ज्ञ ,जाणकार आपली भुमिका मांडून मराठा आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे.

त्यानंतर सायंकाळी पुढील आंदोलनाबाबत प्रसार माध्यमांना माहीती दिली जाणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या निमंत्रकांनी कळवले आहे. तरी सर्व राज्यातील जिल्ह्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या