नाशिक | प्रतिनिधी Nashik
शहरात राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस (State Table Tennis Competition) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नासिक जिमखाना (Nasik Gymkhana) येथे ३ ते ६ आक्टोबर दरम्यान या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत १९ व २१ वर्षाखालील वयोगटातील मुले व मुली एकेरी तसेच पुरुष व महिला एकेरी अशा सहा गटातील होणार आहेत….
नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटना आणि महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या कामगिरीच्या आधारे राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची (Maharashtra team selection after competition) निवड होणार आहे. या स्पर्धा एकूण सहा टेबलावर खेळावल्या जाणार असून नामको कंपनीचे टेबल्स वापरली जाणार आहेत.
या स्पर्धा आयोजन करतांना कोविड नियमावलीचे (Covid Norms) तंतोतंत पालन करण्यात येणार असून शासकीय नियमाप्रमाणे हॉल मध्ये नियमानुसार ठरवून दिलेल्या संख्येईतकेच खेळाडू आणि त्यांचे मार्गदर्शक व इतर व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार आहे.
या स्पर्धेतील सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूंना तसेच पंचांना आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी करणे बंधनकारक केलेले असून हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येकाचे तापमान आणि पल्स तपासण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण ३८५ प्रवेशिका आल्याअसून या स्पर्धेतील विजेत्या उपविजेत्या बरोबर उपांत्य फेरीतील खेळाडूंना रोख पारितोषिक आणि मेडल्स देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
मोबी स्पोर्ट्स, मुंबई यांच्या मार्फत या स्पर्धेचे लाईव्ह प्रसारण यु टयूब व फेसबुक वर करण्यात येणार आहे. हे प्रसारण संपूर्ण देशात पाहता येईल.
या स्पर्धेतील मानांकन खालील प्रमाणे मानांकन देण्यात आले आहे.
पुरुष गट
१) सिद्धेश पांडे (ठाणे) २) चिन्मय सोमैय्यां (मुंबई उपनगर) ३)शिवम दास (मुंबई उपनगर) ४)दीपित पाटील (ठाणे)
महिला गट
१)मधुरिका पाटकर (मुंबई उपनगर) २)पुजा सहस्रबुद्धे (पुणे ), ३)श्रुती अमृते (ठाणे ) ४)दिव्या देशपांडे (मुंबई उपनगर)
२१ वर्षाखालील मुले
१) रेगन आल्बुकर (मुंबई उपनगर), २)चिन्मय सोमैय्या (मुंबई उपनगर) ३) शिवम दास (मुंबई उपनगर), ४) रित्विक नागले (मुंबई उपनगर)
२१ वर्षाखालील मुली
१) तनिषा कोटेचा (नाशिक), २) सायली वाणी (नाशिक), ३) अदिती सिन्हा (मुंबई उपनगर) ४) विधी शाह (मुंबई उपनगर)
१९ वर्षाखालील मुले
१) दीपित पाटील (ठाणे), २)रित्विक नागले (मुंबई उपनगर), ३)कुशल चोपडा (नाशिक), ४) जश मोदी (मुंबई उपनगर)
१९ वर्षाखालील मुली
१) तनिशा कोटेचा (नासिक)२) सायली वाणी (नासिक)३) जेनिफर वर्गीस (नागपूर)४) समृद्धी कुलकर्णी (सोलापूर)