Tuesday, May 21, 2024
Homeनगरपाच टक्के निधी परत मिळण्यासाठी न्यायालयात जाणार

पाच टक्के निधी परत मिळण्यासाठी न्यायालयात जाणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

1996 ते 2000 दरम्यान कामगार करारातील कपात केलेला 5 टक्के निधी परत मिळण्याबाबत न्यायालयात जाण्याचा निर्णय राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. नगर शहरात सोमवारी राज्य परिवहन निवृत्त कर्मचार्‍यांची बैठक सचिव गोरख बेळगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

- Advertisement -

बैठकीस संघटनेचे अध्यक्ष बलभीम कुबडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकित संघटनेच्या आतापर्यंतच्या कामकाजाबाबत व सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याबाबत केलेल्या कार्याची सुरू असलेल्या पाठपुराव्याची माहिती देण्यात आली. प्रास्ताविकात संघटनेचे कार्याध्यक्ष अर्जुन बकरे यांनी कामगार संघटनेने 1996 ते 2000 जो करार केला, त्यामध्ये फरकाच्या रकमेमधून 5 टक्के रक्कम कपात करून घेतली. ती रक्कम परत मिळण्याबाबत सुरु असलेली कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. गोरख बेळगे म्हणाले, सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष सुरू आहे. सन 1996 ते 2000 दरम्यान कामगार करारातील कपात केलेले 5 टक्के निधी परत मिळण्यासाठी संघटनेच्यावतीने वैयक्तिक न्यायालयात दावा दाखल केला जाणार असल्याचे स्पष्ट केले. या निर्णयाला उपस्थित सर्व सेवा निवृत्त एस.टी. कर्मचार्‍यांनी सहमती दर्शवली.

बलभीम कुबडे यांनी सन 1996 ते 2000 च्या कामगार करारातील मिळालेल्या एकूण रकमेतून 5 टक्के कपात केलेली मान्यताप्राप्त संघटनेकडून निधी परत मिळवण्यासाठी प्रत्येकाचा वैयक्तिक अर्ज भरून घेतला जाणार आहे, असे सांगितले. यासोबतच मे 2019 पासून सेवानिवृत्तीच्या थकीत रकमेबाबत संघटना वरिष्ठस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तर करोनामुळे विस्कळीत झालेली राज्य परिवहन महामंडळाची सेवा सुरळीत सुरु झाल्यावर जिल्ह्यातील सर्व आगारांना पदाधिकारी भेट देणार असून, राहिलेल्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनी फॉर्म त्वरित सादर करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी खजिनदार विठ्ठल देवकर, अ‍ॅड. साहेबराव चौधरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या बैठकीसाठी जिल्ह्यातील एस.टी. महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या