Tuesday, June 25, 2024
Homeमुख्य बातम्याकर्मचारी धोरणाविरोधात 'या' महिन्यापर्यंत राज्यव्यापी जनजागरण यात्रा

कर्मचारी धोरणाविरोधात ‘या’ महिन्यापर्यंत राज्यव्यापी जनजागरण यात्रा

नाशिक | प्रतिनिधी

- Advertisement -

२० नोव्हेंबर पासून कोल्हापूर येथून आयटक महाराष्ट्र (AITUC) वतीने केन्द्र व राज्य शासनाच्या कामगार कर्मचारी धोरणा विरोधात २० डिसेंबरपर्यंत राज्यव्यापी जनजागरण यात्रा (State Wide Janjagran Yatra) निघणार आहे. यात्रा कोल्हापूर पासून सुरू होऊन नागपूरला समारोप होणार आहे. यात्रा उत्तर महाराष्ट्र प्रवेश केल्यावर भव्य स्वरूपात स्वागत करून मोहिम यशस्वी करावी. असे आवाहन आयटक राष्ट्रिय सचिव कॉ. बबली रावत यांनी केले.

आयटक संलग्न कामगार कर्मचारी संघटनाचा उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी मेळावा द्वारका नाशिक येथे कॉ. दत्ता देशमुख सभागृहात पार पडला. सदर मेळावा केंद्र व राज्य सरकारच्या कामगार कर्मचारी धोरणांच्या विरोधात एल्गार पुकारून त्याविरोधात आयोजलेल्या जनजागरण यात्रेच्या नियोजनावर चर्चा केली.

मेळाव्याचे अध्यक्ष जेष्ठ विज कामगार आयटक नेते व्ही. डी. धनवटे होते तर प्रमुख मार्गदर्शक आयटक राज्य सचिव राजू देसले, राष्ट्रीय बिडी कामगार नेते कारभारी उगले, सुधीर टोकेकर, अमृत महाजन, सखाराम दुर्गुडे, नामदेव बोराडे, वैशाली खंदारे, एस . खातिब ,हसीना शेख, माया घोलप, दत्तू तुपे, भिका बांडे , राजेंद्र चौधरी, असे विविध संघटनेचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.

यावेळी प्रगतिशील लेखक संघाच्या राष्ट्रीय सचिव पदी निवड झाल्याबद्दल लेखक राकेश वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच घरेलू कामगार संघटनेच्या पदाधिकारी मीनाताई आढाव यांची कन्या काजल आढाव यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण पूर्ण करून ज्युनियर इंजिनियर म्हणून विद्युत खात्यात नेमणूक झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

केंद्र सरकार कामगार विरोधी धोरण राबवत आहे. योजना कर्मचारी आशा, गट प्रवर्तक, अंगणवाडी, अंशकालीन स्री परिचर, उमेद, ग्राम रोजगार सेवक, आदींचे शोषण करत आहे. मणिपूर महिला अत्याचारबाबत पंतप्रधान बोलत नाही. नवीन कामगार कायदे लागू झाले तर कामगारना संघटित करणे कठीण होणार आहे. इपिएस ९५ पेन्शनर ९ हजार रूपये पेन्शन महागाई भत्ता सह लागू करा यासाठी आंदोलन करतं आहे. कंत्राटी पद्धतीने शोषण सुरू आहे.

वीज, बँक, विमा उद्योग खाजगीकरण करून विकण्याचे काम सुरु आहे. या विरोधात देशभर आयटक लढत आहे. महाराष्ट्र आयटक वतीने २० नोव्हेंबर पासुन कोल्हापूर ते नागपूर राज्य व्यापी कामगार कर्मचारी धोरण विरोधात एल्गार पुकारला जाणार आहे. व नागपुर येथे हिवाळी अधिवेशनात वर १ लाख चा भव्य मोर्चा व्हावा यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन केले.

२०२४ शेतकरी कामगार विरोधी, महागाई वाढवणारे,भाजप सरकारचा पराभव करावा असे आवाहन बबली रावत यांनी केले. या प्रसंगी सुनिता कुलकर्णी, रेणुका वंजारी , सुरेखा खैरनार, चित्रा जगताप, सुरेश पानसरे, निवृत्ती दातीर, शिवराम रसाळ, भाऊसाहेब शिंदे , उषा अडांगळे, आदींनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यात सिता शेलके, जयश्री गुरव, बाळू ढाकणे, राजेन्द्र जाधव, मंदाकिनी पाटिल, संगीता बिरारे, प्रकाश शिंदे आदि उपस्थित होते. सूत्र संचलन भीमा पाटील यांनी केले. आभर दत्तू तुपे यांनी मानले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या