Sunday, November 24, 2024
Homeअग्रलेखअपनी कह पाने का नाम औरत है..

अपनी कह पाने का नाम औरत है..

महिलाच महिलांच्या वैरी असतात. वंशाचा दिवा, विधवा प्रथा अशा अनेक मुद्यांवर महिलांनी त्यांचे विचार बदलण्याची गरज आहे असे मत राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले. एका जनसुनावणीप्रसंगी त्या बोलत होत्या.

काही अंशी त्यांचे म्हणणे महिलाही कदाचित मान्य करतील. महिला अनेक कालबाह्य रूढी आणि परंपरांच्या ओझ्याखाली वर्षानुवर्षे दबल्या आहेत. विधवा प्रथेविरोधात काही ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला आहे. तथापि ही प्रथा महिलांनी विनातक्रार पाळावी अशी अनेक महिलांची इच्छा नसते का? नव्हे पतिनिधनाचा दुर्दैवी प्रसंग ओढवलेल्या महिलेने विधवा प्रथा पाळावी असा कळत-नकळत दबाव आणला जात असावा का? त्यात महिलांचा पण सहभाग असतो हे नाकारता येईल का? मूल होत नसलेल्या महिलेला वांझ म्हणून हिणवणाऱ्या महिलाच नसतात का? घरातील मुलींनी त्यांच्या वाट्याला आलेले दुय्य्मत्व मूकपणे सहन करावे असे त्यांना कोण शिकवते? घरातील छोटा-मोठा निर्णय घरातील पुरुषांना विचारून घ्यावा असा आग्रह कोण धरते? घरातील मुलींना रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहायला आक्षेप घेणाऱ्या महिला नसतात का? अशा अनेक मुद्यांविरोधात विविध महिला संघटना, सामाजिक संस्था आवाज उठवत आहेत. संघर्ष करत आहेत. महिलाही त्यात सहभाग वाढवत आहेत हे खरे. पण अशा महिलांची संभावना समाज कसा करतो हे महिलाही जाणून आहेत. त्याला किती महिला विरोध करतात? प्रयत्न करणाऱ्या महिलांच्या मागे किती महिला स्वयंस्फूर्त पाठबळ निर्माण करतात? महिलांना त्यांची मानसिकता बदलावी लागणार आहे. त्यासाठी अविचल आणि अखंड प्रयत्न करावे लागतील. महिलांच्या वर्तनाचा दोष फक्त त्यांनाच देणे अयोग्य ठरेल. महिला वर्षानुवर्षे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा काच सहन करत आल्या आहेत. त्यांच्या मनावर वर्षानुवर्षे पुरुषप्रधानतेचा पगडा असतो. त्याच रिंगणात राहण्याची सवय महिलांना जडलेली असते. त्यात काही चूक आहे या जाणिवेचाच अभाव असतो. ती झाली तरी बदलाचे धाडस सगळ्या जणी दाखवू शकतील असे नाही. मानसिक स्तरावर बदलाची आवश्यकता पटायलाच मोठा काळ जावा लागेल. त्यांचेही काहीतरी चुकते आहे हे लक्षात येईल. कदाचित त्यानंतर कधीतरी जाणिवेचे रूपांतर नेणिवेत होऊ शकेल. महिलांमध्ये शक्ती आणि ताकद असते हे सावित्रीबाई फुलेंसारख्या अनेक महिलांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केले आहे. सावित्रीबाईंनी दगडगोटे खाऊन शिक्षणाची वाट धरली. समाजाच्या दबावाला त्या बळी पडून त्यांच्या ध्येयापासून ढळल्या असत्या तर आज लाखो महिला शिकू शकल्या नसत्या. ‘पहाड सी मुसीबतों के बीच..आगे बढ पाने का नाम औरत है..दहाडती नसिहतों के बीच..अपनी कह पाने का नाम औरत है..’ असे प्रसिद्ध महिला कार्यकर्त्या आणि लेखिका कमला भसीन म्हणतात. त्यातील मर्म महिलांनी लक्षात घ्यावे असेच कदाचित रुपाली चाकणकर याना सुचवायचे

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या