Friday, June 14, 2024
Homeमुख्य बातम्याNashik : ...तर आज राजकीय चित्र वेगळं असतं; नेमकं काय म्हणाल्या पंकजा...

Nashik : …तर आज राजकीय चित्र वेगळं असतं; नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

भाजप नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या पुतळ्याच्या अनावरण आज नाशिकमध्ये (Nashik) होत आहे. त्यानिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या नाशिकमध्ये दाखल झाल्या असून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना नाशकात होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नाही असे पंकजा मुंडे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नाही, ही चर्चा मी तुमच्याकडून ऐकत आहे. मी या कार्यक्रमाची यजमान नाही त्यामुळे यावर बोलणे अयोग्य ठरेल, असे त्यांनी सांगितले.

अवकाळी पावसानं बळीराजाला रडवलं! पेठ तालुक्यात आंब्याचं मोठं नुकसान

शेतकऱ्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. यावर त्या म्हणाल्या की, सरकारने शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, अशी माझीही अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

चंद्रशेखर बावनकुळेंचा ‘त्या’ विधानावरून ‘यू-टर्न’

तसेच आज गोपीनाथ मुंडे असते तर परिस्थिती वेगळी असती का? असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी म्हटले की, जर पक्षात काही नेते आज असते तर निश्चितपणे राजकीय चित्र वेगळे असते. मुंडे यांच्या या प्रतिक्रियेमुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या