Sunday, December 15, 2024
Homeनाशिकग्रामीण रुग्णालय उभारणीसाठी निवेदन

ग्रामीण रुग्णालय उभारणीसाठी निवेदन

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

दिंडोरी तालूक्यातील ( Dindori Taluka ) उमराळे बुद्रुक ( Umrale Br )येथे ग्रामीण रुग्णालय ( rural hospital )व्हावे अशी मागणी उमराळे बुद्रुकचे जेष्ठ नेते डॉ. पुंडलिक धात्रक यांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार ( Union Minister of State Dr. Bharti Pawar )यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यातील उमराळे बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्रात सुमारे 25 ते 30 गावे येतील. कोचरगाव प्राथकि आरोग्य केंद्र, ननाशी प्राथमिक आरोग्य केद्र व त्या परिसरातील गावे आपण नव्याने केलेला पेठ – धरमपुर राज्य मार्ग क्र.448 या मार्गावर उमराळे बुद्रुक गाव असल्याने अपघात झाल्यास उपाचारासाठी नाशिक व अन्यत्र ठिकाणी पोहचेपर्यत अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहे.

तरी महामार्गावरील गाव म्हणुन उमराळे बुद्रुक येथे ग्रामीण रुग्णालय मंजुर करावे अशी मागणी डॉ. पुंडलिक धात्रक, बाळासाहेब दिवटे, दिलीप जाधव, खंडेराव संधान, गंगाधर निखाडे, बाळासाहेब गायकवाड, मनोहर चौधरी आदी उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या