Saturday, May 25, 2024
Homeनाशिकरेल्वे सेवक संघटनेतर्फे निदर्शने

रेल्वे सेवक संघटनेतर्फे निदर्शने

मनमाड । प्रतिनिधी Manmad

रेल्वेचे खाजगीकरण करण्याचा घाट केंद्र सरकार घालत आहे.

- Advertisement -

असा आरोप करत ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशनतर्फे शहरात रेल्वे वर्कशॉप आणि इंजिनियर कार्यालय या दोन ठिकाणी मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त कामगारांनी तीव्र निदर्शने करत केंद्र सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता.

यावेळी आंदोलकांतर्फे कारखाना प्रबंधक मोहम्मद फैज यांना निवेदन देण्यात आले. शासनाने रेल्वेचे खाजगीकरण करू नये अन्यथा सर्वच रेल्वे कामगार संघटना चक्काजाम आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला.

केंद्र शासनाने अनेक रेल्वे गाड्या, स्टेशन, कारखाने खासगी उद्योगाला देण्याचा धडाका लावला असून आगामी काळात संपूर्ण रेल्वे विभागाचे खाजगीकरण केले जाईल, अशी भिती रेल्वे कामगारांना वाटत असून या खाजगीकरणाच्या विरोधात रेल्वे कामगार संघटना रस्त्यावर उतरल्या आहे.

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशनतर्फे मोर्चा काढून धरणे आंदोलन करत निदर्शने केली गेली. रेल्वेचे खाजगीकरण केल्यास चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

यावेळी रत्नदीप पगारे, शरद झोबाड, प्रदीप गायकवाड, सम्राट गरुड, अजित जगताप, रोहन उबाळे, आनंद संसारे, वसंत सोनवणे, भगवान केदारे, राहुल केदारे, पंकज कदम, प्रतिभा पगारे, सुषमा सोनवणे, प्रवीण अहिरे, सचिन इंगळे, शरद झोबाड, प्रविण बागुल, प्रकाश बोडके, संजय दिक्षित आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन सिध्दार्थ जोगदंड यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या