दिंडोरी । प्रतिनिधी Dindori
आदिवासी तालुक्यांना ( tribal talukas ) भेडसावणारा पाणी प्रश्न सोडवावा( The water problem should be solved ), अशी मागणी जलपरिषदेच्या मनिषा घांगळे यांनी अनुसूचित जमाती कल्याण समितीकडे केली आहे. याबाबत समितीच्या सदस्यांना थांबवून मनिषा घांगळे यांनी आदिवासी भागाचा प्रश्न मांडला.
गौरव कोहकिरे, योगेश गावीत, मनीषा घांगळे यांनी जल परिषद पाणी प्रश्नांबाबत काम करीत असल्याची माहिती दिली. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा व दिंडोरी तसेच पालघर मधील जव्हार या तालुक्यातील तीव्र डोंगर उताराची भौगोलिक परिस्थिती व तुटपुंजी जलसिंचन स्थिती लक्षात घेऊन तालुक्यातील छोटे छोटे सिंचन प्रकल्प तातडीने मार्गी लावणे आवश्यक आहे.
गावालगत छोटे बंधारे, तलाव, नद्यांवर केटी बंधारे बांधण्यात यावे, नादुरुस्त बंधार्याची दुरुस्ती करण्यात यावी, यापुर्वीही चुकीच्या पद्धतीने विहीरींची जागा निवड, गावालगत पाणी न अडवल्याने योजना करूनही शासनाचे लाखो रूपये वाया गेले आहे. यावर नुकतीच मनेरगा अंतर्गत काही प्रमाणात काम झाले आहे परंतू अद्यापही मोठ्या प्रमाणावर के टी बंधारे, लघु सिंचन प्रकल्पाचे काम बाकी आहे.
तरी तातडीने जल सिंचन प्रकल्पाचे काम हाती घेण्यात यावे, अशी मागणी गौरव कोहकिरे, योगेश गावीत, मनीषा घांगळे आदींनी केली. त्यावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन अनुसूचित जमाती कल्याण समितीने दिले आहे.