Monday, July 22, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यातील नवे माहिती तंत्रज्ञान धोरण लवकरच जाहीर होणार- उद्योगमंत्री सामंत

राज्यातील नवे माहिती तंत्रज्ञान धोरण लवकरच जाहीर होणार- उद्योगमंत्री सामंत

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

सद्यस्थितीत राज्यातील माहिती तंत्रज्ञान हबसंदर्भात ( IT Hub)राज्य सरकारकडे कोणतेही धोरण नाही. पण २०२३ मधील राज्याचे नवे आयटी धोरण येत्या पंधरा दिवसांत उद्योजकांसमोर आणणार आहोत, अशी घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत ( Industries Minister Uday Samant)यांनी मंगळवारी विधानसभेत केली. तज्ज्ञांशी, आयटी विभागाशी, उद्योग विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून, देशातील सर्वात उत्कृष्ट आणि चांगले नवीन आयटी धोरण बनविणार, असा विश्वासही सामंत यांनी व्यक्त केला.

आज विधानसभेत अर्धा-तास चर्चेच्या दरम्यान शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी महराष्ट्रात आयटी कंपन्या आल्या पाहिजेत असे सांगतानाच राज्यातील छोट्या शहरात आयटी केंद्र उभारण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर उत्तर देताना सांमत म्हणाले, एखाद्या जागेवर आयटी कंपन्या येतात तेव्हा आयटी हब तयार होतो. पण आयटी हबसंदर्भात राज्य सरकारकडे कोणतीही धोरण नाही. आयटी धोरण लवकरात लवकर तयार करण्यासंदर्भात सरकार म्हणून आम्ही सहमत आहोत. उद्योग विभागाची पहिले आयटी धोरण १९९८ मध्ये झाली. त्यानंतर २००३, २००९, २०१५ मध्ये धोरण झाले. आता २०२३ चे नेवे आयटी धोरण येणार आहे. ते येत्या १५ दिवसांत महाराष्ट्रातील उद्योजकांसमोर आणण्यात येईल.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

कोल्हापूरमध्ये छोट्याप्रमाणात आयटीपार्क असून तेथे १०००-१२०० लोक काम करत आहेत. पण तेथे विस्तारासाठी वाव असेल आणि तेथे आयटी कंपन्या आल्यानंतर बेरोजगारी दूर होऊन रोजगार मिळणार असेल तर आयटी पार्कच्या विस्तारासंदर्भात उद्योग विभाग सकारात्मक चर्चा करेल, असेही सामंत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

केळाच्या खोडापासून कापड तयार करणार

विभागावार आयटी पार्कची निर्मिती केल्यास शहराकडे येणारे लोंढे थांबतील आणि ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगारही मिळेल, त्यादृष्टीने सरकारने प्रयत्न करावा, अशी मागणी, भाजपचे आमदार संजय सावकारे यांनी केली. त्यावर बोलताना सामंत म्हणाले, जळगाव जिल्ह्यात एक नाविण्यपूर्ण उद्योग येत आहे. केळ्याच्या खोडातील फायबर काढून त्यापासून कापड बनविणारा देशातील पहिला कारखाना जळगावला होत आहे. पण सर्व जिल्ह्यांत आयटी पार्क बनविणे शक्य नाही. पण जेथे आवश्यकता आहे तेथे आयटी पार्क केले जातील, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या