Monday, May 27, 2024
Homeनाशिकआईनंतर मिळते मावशीची माया, पण मावशीने दाखवली क्रूर काया; दिव्यांग बालकाचा छळ

आईनंतर मिळते मावशीची माया, पण मावशीने दाखवली क्रूर काया; दिव्यांग बालकाचा छळ

दिंडोरी | प्रतिनिधी

माय मेली तरी मावशी जगावी अशी म्हण आहे, पण आई व मावशी या दोन्ही नात्यांना काळिमा फासणारी घटना दिंडोरी तालुक्यातील पाडे येथे घडली. दिव्यांग मुलाला सावत्र आई असलेल्या मावशीने अंगावर चटके देत अमानुष छळ केल्याच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने उघडकीस आला आहे…

- Advertisement -

या बालकावर नाशिकला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून दिंडोरी पोलिसांनी घटनेची दखल घेत कारवाई सुरू केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पाडे येथील तीन वर्षीय मतिमंद असलेल्या बालक त्याच्या सावत्र आईसोबत राहतात. सावत्र आईने या बालकास शरीरावी अनेक ठिकाणी चटके देत अत्याचार केले.

ही घटना काही नागरिकांना समजताच त्यांनी त्यास दिंडोरी येथे उपचारासाठी नेले तेथे उपचार करून पुढे अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

सदर सावत्र आई ही त्या बाळाची मावशी आहे. कौटुंबिक कलहातून सोडून गेलेल्या आईनंतर सावत्र आई ही मावशी असल्याने तिची माया मिळेल ही आशा फोल ठरत नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेने संताप व्यक्त होत आहे.

दिंडोरी पोलिसांनी घटनेची दखल घेत कारवाई सुरू केली असून पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कलपेशकुमार चव्हाण करत आहे.

सावत्र आई म्हणते…

या घटनेनंतर सावत्र आईच मुलाला घेऊन रुग्णालयात आली. मुलाला चटके दिल्याचा आरोप तिने फेटाळला आहे. हा लहानगा आणि त्याच्या मोठ्या भावामध्ये भांडण झालं त्यातून ही घटना घडली आहे, असा दावा तिने केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या