Tuesday, March 25, 2025
Homeक्रीडाभारताकडून पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथचा वन डे क्रिकेटला अलविदा

भारताकडून पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथचा वन डे क्रिकेटला अलविदा

दिल्ली । Delhi

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत सलग तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश केला.

- Advertisement -

सेमीफायनलमध्ये भारताकडून पराभव होणं हा ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी मोठा धक्का आहे. दरम्यान यानंतर ऑस्ट्रेलियन संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने वनडे क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, स्मिथ अजूनही ऑस्ट्रेलियासाठी कसोटी आणि टी-२० क्रिकेट खेळण्यासाठी उपलब्ध असेल.

स्टीव्ह स्मिथ म्हणाला, हा एक अद्भुत प्रवास होता आणि मी त्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. खूप छान क्षण आणि अद्भुत आठवणी आहेत. दोन विश्वचषक जिंकणे ही एक मोठी कामगिरी होती आणि हा प्रवास शेअर करण्यासाठी अनेक अद्भुत सहकारी होते. २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरू करण्याची ही एक उत्तम संधी आहे, त्यामुळे हीच योग्य वेळ वाटते. स्टीव्ह स्मिथ पुढे म्हणाला, कसोटी क्रिकेट अजूनही प्राधान्य आहे आणि मी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये, हिवाळ्यात वेस्ट इंडिजमध्ये आणि नंतर घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध खेळण्यास उत्सुक आहे. मला वाटते की त्या व्यासपीठावर मला अजूनही खूप काही योगदान द्यायचे आहे.

स्टीव्ह स्मिथने २०१० मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या काळात त्याने ऑस्ट्रेलियासाठी एकूण १७० एकदिवसीय सामने खेळले. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ४३.२८ च्या सरासरीने ५८०० धावा केल्या, ज्यामध्ये ३५ अर्धशतके आणि १२ शतके समाविष्ट आहेत. तो त्याच्या देशासाठी सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा १६वा आणि १२वा खेळाडू आहे. त्याच वेळी, टीम इंडियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातही त्याची कामगिरी चांगली होती. स्मिथने भारताविरुद्ध ३० एकदिवसीय सामने खेळले आणि ५३.१९ च्या सरासरीने १३८३ धावा केल्या. ज्यामध्ये ७ अर्धशतके आणि ५ शतके देखील समाविष्ट आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...