Monday, April 7, 2025
Homeब्रेकिंग न्यूजStock Market: शेअर बाजारासाठी आज 'Black Monday'; बाजार उघडताच सेंसेक्स ३ हजारांनी...

Stock Market: शेअर बाजारासाठी आज ‘Black Monday’; बाजार उघडताच सेंसेक्स ३ हजारांनी तर निफ्टीत ११०० अंकांची घसरण

मुंबई | Mumbai
डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफच्या घोषणेमुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे. देशांतर्गत शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण पाहायला मिळत आहे. बाजारासाठी आजचा दिवस ब्लॅक मंडे ठरताना दिसतोय. प्री ओपनिंग सेशन आणि प्रत्यक्ष बाजार उघडल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. भांडवली बाजाराचे व्यवहार सुरु होताच सेन्सेक्स 2,743 अंकांनी कोसळला आहे. तर निफ्टीही जवळपास 900 अंकांनी खाली घसरला आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांच्या पैशांचा चुराडा झाल्याचे पहायला मिळत आहे.

शेअर बाजाराच्या घसरणीचे प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ बॉम्ब’ धोरणामुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. या टॅरिफ धोरणाचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे. या धोरणांमुळे आयात-निर्यातीवर परिणाम होण्याची भीती असल्यामुळे अनेक कंपन्यांचे शेअर्स घसरले. विशेषतः बँकिंग, ऑटोमोबाईल आणि आयटी क्षेत्रातील शेअर्सवर मोठा दबाव दिसून येत आहे. सेन्सेक्स तब्बल ३ हजार अंकांनी कोसळल्याने गुंतवणूकदारांचे जवळपास १८ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. शेअर बाजारातील हा ट्रेंड दिवसभर कायम राहिल्यास भारतीय गुंतवणुकदारांना खूप मोठे नुकसान सोसावे लागु शकते.

- Advertisement -

डोनाल्ड ट्रम्प टॅरिफमुळे सलग तीन दिवस अमेरिकेच्या बाजारात मोठी घसरण झाली आणि अमेरिकेतील घसरणीचा फटका आशियाई बाजारांनादेखील बसला. गिफ्ट निफ्टी ९०० अंकांनी घसरून २२,१०० अंकांवर तर निक्केई ६ टक्क्यांनी म्हणजेच २३०० अंकांनी घसरून बंद झाला. गुंतवणुकदारांच्या जोरदार विक्रीमुळे अमेरिकन बाजारात खळबळ उडाली होती. शुक्रवारी बाजार ५ वर्षांतील सर्वात मोठी घसरण होत शेअर बाजार ६ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. डाऊ २२५० अंकांनी तर नॅसडॅक जवळपास १००० अंकांनी घसरला. कोरोनानंतरची ही सर्वात मोठी घसरण म्हंटले जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, ही घसरण तात्पुरती असू शकते, परंतु जर जागतिक आर्थिक परिस्थिती आणखी बिकट झाली तर बाजाराला सावरायला वेळ लागू शकतो. या परिस्थितीत गुंतवणूकदारांना संयम ठेवण्याचा आणि घाबरून निर्णय न घेण्याचा सल्ला दिला जात आहे. शेअर बाजारातील हा हाहाकार लवकर थांबेल, अशी आशा सर्वांना आहे.

सोमवारी टाटा स्टील शेअरमध्ये मोठी घसरण झाली. हा शेअर १०.४३ टक्क्यांनी घसरून १२५.८० रुपयांवर आला. याशिवाय टाटा मोटर्स शेअर (८.२९%), इन्फोसिस शेअर (७.०१%), टेक महिंद्रा शेअर (६.८५%), एलटी शेअर (६.१९%), एचसीएल टेक शेअर (५.९५%), अदानी पोर्ट्स शेअर (५.५४%), टीसीएस शेअर (४.९९%), रिलायन्स शेअर (४.५५%) आणि ४.०४ एनटीपीसी शेअर (४.५५%) घसरले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : ७ एप्रिल २०२५ – केल्याने होत आहे रे

0
काही राज्यांमध्ये उष्मा आणि काही राज्यांवर पावसाचे सावट अशा परस्परविरोधी दोन स्थिती लोक सध्या अनुभवतात. पर्यावरण प्रदूषण आणि त्याचे दुष्परिणाम सगळेच जाणून आहेत. माध्यमे...