Monday, June 24, 2024
Homeब्रेकिंग न्यूजएक्झिट पोल्सच्या अंदाजानंतर शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स, निफ्टीमध्ये उच्चांकी उसळी

एक्झिट पोल्सच्या अंदाजानंतर शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स, निफ्टीमध्ये उच्चांकी उसळी

मुंबई | Mumbai

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. तर दुसरीकडे एक्झिट पोल्सनी (Exit Polls) एनडीएच्या बाजूने कौल दिल्यानंतर त्याचे पडसाद शेअर बाजारावर (Stock Market) उमटतांना दिसत आहेत. जवळपास सर्वच एक्झिट पोल्सनी एनडीएच्या बाजूने बहुमत असेल, असे अंदाज वर्तविले होते. या अंदाजानंतर परदेशी गुंतवणूकदार पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजाराकडे वळल्याचे चित्र दिसत आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये उच्चांकी उसळी पाहायला मिळाली आहे.

यात निफ्टीच्या (Nifty) निर्देशांकात ३.५८ टक्क्यांची तर सेन्सेक्समध्ये ( Sensex) ३.५५ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्समध्ये २,६२१.९८ अकांची वाढ होऊन निर्देशांक ७६ हजारांच्याही पुढे गेलेला पाहायला मिळाला. तर पहिल्यांदाच सेन्सेक्सने ७६ हजारांचा टप्पा पार केला. तसेच निफ्टीमध्येही ८०७.२० अकांची वाढ होत निर्देशांक २३,३३७ च्याही पुढे गेला. नंतर तो २३,००० वर स्थिर असल्याचे दिसले. सध्या हे दोन्ही निर्देशांक तेजीत असल्याने सत्राच्या पहिल्या काही मिनिटांतच गुंतवणूकदारांनी चांगली कमाई केली आहे.

दरम्यान, विश्लेषकांच्या मते, या आठवड्यातील दोन मोठ्या घडामोडींमुळे शेअर बाजारात तेजी दिसत आहे. एकतर ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहेत, ज्याचा कौल एक्झिट पोल्सनी दिला आहे. तसेच ७ जून रोजी आरबीआयकडून व्याजदराची घोषणा गव्हर्नर शक्तीकांत दास करणार आहेत. या दोन्ही घडामोडीमुळे शेअर बाजारात उत्साह दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या