Saturday, July 27, 2024
Homeनगरचोरीच्या दुचाकीचे शेंडीत होतात सुट्टे पार्ट

चोरीच्या दुचाकीचे शेंडीत होतात सुट्टे पार्ट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील (Nagar- Chhatrapati Sambhajinagar Highway) शेंडी (ता. नगर) शिवारात कृष्णा अ‍ॅटो कन्सटल्ट या दुकानावर एमआयडीसी पोलिसांनी छापा (MIDC Police Raid) टाकून चोरीच्या पाच दुचाकी व 16 चोरीच्या दुचाकीचे (Stolen Bikes) सुट्टे पार्ट असा एकुण दोन लाख 13 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) केला आहे. मंगळवारी (दि. 19) पोलिसांनी ही कारवाई केली.

- Advertisement -

नगर जिल्ह्यात महिला आमदारांची संख्या वाढणार?

याप्रकरणी पांडुरंग गोविंद शिंदे (वय 55 रा. शेंडी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील शेंडी (ता. नगर) शिवारात कृष्णा अ‍ॅटो कन्सटल्ट येथे काही दुचाकी (Bike) व दुचाकीचे खोललेले इंजिन चेसी व इतर साहित्य पडलेले असून ते चोरीचे असल्याची शक्यता आहे, अशी माहिती सहा. पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस अंमलदार महमंद शेख, थोरवे, अनिल आव्हाड, फकीर शेख, दीपक गांगर्डे, राजु सुद्रीक, बंडू भागवत, किशोर जाधव, तांदळे, दहिफळे, वंजारी यांचे पथक तयार करून पंचासमक्ष नमूद ठिकाणी छापा (Raid) टाकण्यास सांगितले. पथकाने छापा टाकला असता त्यांना पाच दुचाकी व 16 दुचाकीचे सुट्टे पार्ट मिळून आले. त्या ठिकाणी असलेला दुकानाचा मालक पांडुरंग शिंदे याच्याकडे पोलिसांनी (Police) दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्याने कोणत्याच दुचाकीचे कागदपत्रे दिले नाहीत. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत दुचाकी व सुट्टे पार्ट जप्त (Bike and Spare Parts Seized) केले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दुधासह दुग्धजन्य पदार्थांचा साठा नष्ट

शेंडीत मोठे रॅकेट

एमआयडीसी पोलिसांनी शेंडी (Shendi) शिवारात छापा (Raid) टाकून चोरीच्या दुचाकीसह काही दुचाकींचे पार्ट जप्त (Seized) केल्याने मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. शेंडी शिवारात वाहन दुरूस्ती करण्याचे अनेक दुकाने आहेत. नगर शहर व उपनगरातून चोरी होणार्‍या दुचाकींचे तेथे सुट्टे पार्ट करून विक्री केले जात असल्याची शक्यता आहे. पोलिसांनी एका दुकानावर छापा (Shop Raid) टाकला असला तरीही तेथे असलेल्या इतर दुकानांची तपासणी केल्यास चोरीचा माल मिळण्याची शक्यता आहे.

बनाव करून तीस लाखांचा लसूण परस्पर विकला

- Advertisment -

ताज्या बातम्या