Friday, December 13, 2024
Homeनगरशेतकर्‍यांना हवे धुळीपासून स्वातंत्र्य

शेतकर्‍यांना हवे धुळीपासून स्वातंत्र्य

अहमदनगर | प्रतिनिधी

खडी क्रेशरच्या धुळीने (Stone crusher dust) शेतीचे नुकसान होत असल्याने अरणगाव (ता. नगर) (Arangoan) हद्दीतील खडी क्रेशरचे परवाने रद्द करावे व नवीन परवाने देणे थांबविण्याच्या मागणीसाठी शेतकर्‍यांनी स्वातंत्र्यदिनी (Independence Day) शेतात काम बंद ठेऊन उपोषण केले.

- Advertisement -

अरणगाव खडी क्रेशर विरोधी शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात आलेल्या या उपोषणात नारायण पवार, अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, सतीश पवार, बबन शिंदे, भानुदास गव्हाणे, अंबादास कल्हापूरे, शिवाजी खंडागळे, संदीप साखरे, परशुराम पवार, संदीप खंडागळे, अंजनाबाई पवार, भिमाबाई साखरे, सखुबाई पवार, केशरबाई गव्हाणे, ललीता शिंदे आदी शेतकरी कुटुंबीय सहभागी झाले होते.

वारंवार निवेदन देऊन व पाठपुरावा करुन प्रश्‍न सुटत नसल्याने आदोलक शेतकर्यांनी शेतीचे औजारे व साहित्य उपोषण स्थळी ठेऊन प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. सदर प्रश्‍नी मार्ग निघत नाही तो पर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा आक्रमक पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे.

अरणगाव हद्दीत मोठ्या प्रमाणात शेतकरी शेती करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहे. दिवसंदिवस या भागात खडी क्रेशरची संख्या झपाट्याने वाढ झाली आहे. मागील चार ते पाच वर्षापासून खडी क्रशरमुळे शेतातील पिकांवर मोठ्या प्रमाणात धुराळा उडून पिकांची नासधूस होत आहे. मागील वर्षी सदर प्रश्‍नी आंदोलन करण्यात आले होते. महसुल प्रशासनाने धुळीचे प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र एका वर्षात चार ते पाच खडी क्रेशर चालकांना परवाना देण्यात आल्याने संपुर्ण परिसर धुळीने माखत आहे. यामुळे शेतकर्यांना पीक घेणे देखील अवघड झाले असून, धुळीच्या त्रासामुळे शेतीचे नुकसान होऊन शेतकरी कुटुंबीयांना श्‍वसनाचे आजार देखील सुरु झाले असल्याचे शेतकर्‍यांनी म्हटले आहे.

या आंदोलनास भाकपचे जिल्हा सहसचिव अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल कांबळे, महाराष्ट्र ड्रायव्हर सेवा संघटनेचे अध्यक्ष गोरख कल्हापूरे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या