Saturday, October 19, 2024
Homeदेश विदेशदगडाची खाण कोसळल्याने १० जणांचा मृत्यू; रेमल चक्रिवादळाचा ईशान्य भारताला फटका

दगडाची खाण कोसळल्याने १० जणांचा मृत्यू; रेमल चक्रिवादळाचा ईशान्य भारताला फटका

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
रेमल चक्रिवादळामुळे पश्चिम बंगाल, ईशान्येकडील राज्यांना मोठा फटका बसला आहे. मिझोराममध्ये दगडांच्या खाणीमध्ये अपघात झाला आहे. भुस्खलन होऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत १० मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे, तर दोन जणांना वाचविण्यात आले आहे. अद्याप अनेक मजूर या ढिगाऱ्याखाली अडकलेले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मिझोराममध्ये एका खाणीत भीषण अपघात झाला आहे. दगडाची खाण कोसळल्याने १० जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी सहा मजूर अन्य राज्यातील आहे तर एक व्यक्ती मीझोरामची आहे. अपघातानंतर सुरू करण्यात आलेल्या बचाव मोहिमेत दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. या अपघानंतर अद्याप बचाव मोहिम सुरु असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे.

- Advertisement -

हे ही वाचा : डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमला मोठा दिलासा; ‘या’ प्रकरणात केली निर्दोष मुक्तता

मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी सांगितले की, बचाव कार्यासाठी आम्ही १५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे, तसेच मृतांच्या नातेवाईकांना आजच मदत जाहीर केली जाणार आहे. राज्यात वादळाचा तडाखा आता ओसरत आहे. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपये सानुग्राह अनुदान मंजूर केले आहे.

मिझोरामची राजधानी असलेल्या आयझॉलमध्ये ही दुर्घटना घडली आहे. आयझॉलच्या मेल्थम आणि हिमेनच्या सीमेवर ही दगडाची खाण असून ती कोसळली. ही खाण कोसळल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात असलेली अनेक घरे देखील नुकसानग्रस्त झाली आहे.

रेमल चक्रीवादळामुळे राज्यात अवकाळी पावसाचा कहर पहायला मिळत आहे. मुसळधार पाऊस आणि वीज पडून अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहे. अनेक ठिकाणी मोठमोठ्या झाडांची पडझड पहायला मिळाली आहे. वादळी वाऱ्यामुळे घरांचे नुकसान झालेय तर अनेक ठिकाणी फळबागा देखील जमीनदोस्त झाल्या आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या रेमल चक्रीवादळामुळे ईशान्य भारतात मुसळधार पाऊस पडत असल्याचे दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या