Tuesday, March 25, 2025
Homeदेश विदेशGujarat Surat : गणेशोत्सवाला गालबोट! मंडपावर दडगफेक, गाड्यांची तोडफोड-जाळपोळ

Gujarat Surat : गणेशोत्सवाला गालबोट! मंडपावर दडगफेक, गाड्यांची तोडफोड-जाळपोळ

सूरत | Surat

देशभरात गणेशोत्सवाची धूमधाम सुरु आहे. देशभरात लाडक्या गणपती बाप्पााच्या भक्तीमध्ये लोक तल्लीन झाले आहेत. पण गुजरातमधील सूरतमध्ये मात्र गणेशोत्सवाला गालबोट लागले आहेत.

- Advertisement -

सुरतच्या लाल गेट येथील एका गणेश मंडळाच्या मंडपावर रविवारी सायंकाळी दगडफेकीची घटना घडली. या घटनेनंतर सुरतमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

दगडफेकीच्या घटनेनंतर तेथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्यामुळे सुरत पोलिसांनी रात्री लाठीचार्ज केला. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

हे देखील वाचा :  ममतांना मोठा धक्का! ‘तृणमूल’वर गंभीर आरोप करत खासदाराचा राजीनामा

या प्रकरणात २७ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या घटनास्थळी तब्बल एक हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (0७ सप्टेंबर) गणपती मंडळाच्या मंडपावर काही अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केली. यामुळे वातावरण चांगलेच चिघळले होते. संतप्त लोकांनी पोलीस चौकीला घेराव घातला. पण वातावरण चिघळल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

हे देखील वाचा :  उच्चभ्रू साेसायटीतील देहव्यापार प्रकरण; दलाल महिलेचा भागीदार…

तरीही जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करावा लागला. त्यानंतर काही प्रमाणात परिस्थितीती नियंत्रणात आली. परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...