छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर काही मद्यधुंद तरुणांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यामध्ये दोन सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत. समोर आलेल्या सीसीटीव्हीमध्ये तीन तरुणांनी घरासमोर येऊन दारूच्या बाटल्या फोडल्याचे दिसून येते. गुरवारी मध्यरात्री १२ ते १२.३० वाजे दरम्यान ही घटना घडली. यात संशयितांना पकडण्याचा प्रयत्न करताना निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात दोन पोलिस जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेवरून पालकमंत्री शिरसाट यांनी संताप व्यक्त केला आहे. “जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या घरावर जर हल्ला होत असेल, तर मग सर्वसामन्यांचे काय?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या सातारा पोलिसांकडून तिघांना अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
रात्री १२ वाजेच्या सुमारास दोन अज्ञात तरुणांनी शिरसाट यांच्या निवासस्थानी जात आत घुसण्याचा प्रयत्न केला. तिथे शिरसाट यांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनी त्यांना विरोध केला. सदर तरुणांनी काही वेळातच आरडाओरडा करत बंगल्याच्या दिशेने दगड, बाटल्या भिरकवल्या. त्यांना पकडण्याच्या प्रयत्नात सुरक्षारक्षक व हल्लेखोरात झटापट होत दोन पोलिस किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले.
मंत्री संजय शिरसाट काय म्हणाले?
मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, “तीन अज्ञात तरुण माझ्या घरासमोर आले. ते मद्यधुंद असावेत, असे सीसीटीव्हीमध्ये दिसून येते. त्यांनी काचेच्या बाटल्या फोडल्या. मात्र, ही घटना घडल्यानंतर पोलीस आयुक्तांना फोन केला तर त्यांचा फोन बंद आला. म्हणजे पोलीस आयुक्तांचा फोन बंद, एकही डीसीपी उपस्थित नाही. एकही एसीपी उपस्थित नाही. एका पालकमंत्र्यांच्या घरावर हल्ला झाला आहे, किमान या घटनेची दखल तर घ्या. पालकमंत्र्यांच्या घरावर हल्ला होत असेल तर सर्वसामान्यांचे काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोलीस आयुक्तांची मी तक्रार करणार आहे.” असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra | Shiv Sena leader and minister Sanjay Shirsat says, “Last night, about three young men arrived in front of my bungalow. All three appeared to be under the influence of an intoxicant. They brandished bottles in front of the security guard stationed at my home, claiming they possessed information regarding the identities of certain individuals. Saying this, they moved toward the house and attempted an assault… The real question is: what exactly is the local police doing? The Police Commissioner’s phone is switched off. No DCP or SP is available… I commend the response of the Director General (DG) of the Maharashtra Police, whom I called in the middle of the night and he assured me of appropriate action… Many such incidents are occurring in this city. Murders are taking place in broad daylight. Several cases of homicide have come to light over the past 8-15 days. It seems that the local Police Commissioner is either indifferent to these incidents or fails to grasp their gravity… I will certainly lodge a formal complaint against the local Police Commissioner with the Chief Minister. Given the current state of law and order in the city, it is imperative that this matter be treated with the utmost seriousness…”
(Source: Minister PRO)— ANI (@ANI) November 13, 2026
या आधीही घरात घुसण्याचा प्रयत्न
पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घराची सुरक्षा भंग होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही एका तरुणाने घरात घुसण्याचा प्रयत्न केला आहे. 2025 च्या जुलै महिन्यात एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तरुणाने सुरक्षा व्यवस्था भेदून चाकू घेऊन त्यांच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्या घटनेनंतरही त्यांच्या निवासस्थानच्या सुरक्षेबाबत मोठी खळबळ उडाली होती.




