Tuesday, April 29, 2025
Homeधुळेआर्वीत कारवर दगडफेक, मारहाण करीत पुण्यातील चित्रकारासह चौघांना लुटले

आर्वीत कारवर दगडफेक, मारहाण करीत पुण्यातील चित्रकारासह चौघांना लुटले

धुळे । dhule । प्रतिनिधी

मुंबई-आग्रा महामार्गावरील आर्वी शिवारात (Arvi Shivar) आज पहाटेच्या सुमारास लुटीची घटना (robbery incident) घडली. अचानक आलेल्या सहा जणांनी कारवर (Throwing stones at cars) दगडफेक करीत पुणे येथील रेखाचित्रकारासह चौघांना मारहाण (beating) करीत त्यांच्याकडून रोकडसह 25 हजारांचा मुद्देमाल लुटून नेला. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून याप्रकरणी अज्ञात सहा जणांवर तालुका पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

- Advertisement -

याबाबत चित्रकार डॉ. राकेश अमरनाथ कदम (वय 45 रा. आप्पा चौक, वाघोली, आव्हाडवाडी, नगर रोड, पुणे) यांनी धुळे तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ते इंदूर येथून त्यांच्या मालकीच्या कारने (क्र.एमएच 12 क्युएम 8017) मित्र प्रशांत विजय कुलकर्णी (वय 45 रा.धनकवाड, पुणे), राकेश अमरनाथ कदम (वय 45 रा. आव्हाडवाडी, पुणे) व नंदकिशोर आटपाळकर (वय 50 रा. नरे आंबेगाव, पुणे) यांच्यासह पुणे येथे जात होते.

रात्री जेवण करून ते आर्वी गावापुढील बालाजी भारत पेट्रोल पंपाच्या बाजुला थांबले आणि कारमध्येचे झोपले. पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अचानक अज्ञात सहा जणांनी कारवर दगडफेक केली. डॉ. कदम यांच्यासह मित्रांना मारहाण सुरू केली. चाकुचा धाक दाखवून राकेश कदम यांच्याकडील पाच हजार रूपये रोख व इंदूर येथील इंदूर येथे कार्यक्रमात मिळालेली गोल्ड मेडल असलेली बॅग, प्रशांत कुलकर्णी यांचा 10 हजरांचा अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल व एक 500 रूपयांचा मोबाईल, नंदकिशोर यांच्या पॅन्टचा खिसा कापून त्यातील 10 हजार रूपये रोख व इतर कागदपत्रे व सहा प्रवासी बॅगा असा एकुण 25 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जबरीने घेवून गेले.

घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पीएसआय सागर काळे, ज्ञानेश्वर काळे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पीएसआय सागर काळे हे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजूरमध्ये आरोग्य विभाग अलर्ट मोडवर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अकोले तालुक्यातील राजूर गावात दूषित पाण्यामुळे काविळसह जलजन्य आजारांचा उद्रेक झाला असून या ठिकाणी आरोग्य विभागाकडून 35 पथके तैनात करण्यात आली आहेत....