Monday, June 24, 2024
Homeनाशिकवणीत वादळी पावसाचा तडाखा

वणीत वादळी पावसाचा तडाखा

वणी । वार्ताहर Vani

- Advertisement -

वणी परिसरात वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावल्याने झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू तर कांद्याचे शेड पडल्याने व्यापार्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

वणी येथे वादळी वार्‍यासह पावसाची जोरदार हजेरी, वादळी वार्‍यामुळे संखेश्वरनगरच्या मागील भागात नांगी नाल्याजवळ वादळी वारा व पावसामुळे किशोर आंबादास भागवत (55)मावडी, ता. दिंडोरी बाभळीच्या झाडाखाली आडोश्याला बसले होते. वादळी वार्‍यामुळे बाभळीचे झाड त्यांच्या अंगावर पडल्याने ते जागीच मरण पावले. ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. गायधनी यांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांत आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

तसेच वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे वणी पिंपळगाव रस्त्यावरील 8 कांद्याच्या शेडची पडझड होऊन लाखो रुपयांच्या कांदा भिजून नुकसान झाले आहे. जोरदार वार्‍यामुळे काही ठिकाणी विजेचे खांब ही पडल्याने मोठे नुकसान होत शहरातील विद्युत पुरवठा खिंडत झाला आहे. दुपारी बारा वाजेच्या दरम्यान अचानक वादळी वार्‍याने अनेक कांदा व्यापार्‍यांचे शेड उडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. विजांचा कडकडाट होऊन जोरदार पावसाची सुरवात झाली.

सकाळ पासून ढगाळ वातावरण होत कमालीची उष्णता वाढलेली होती. अचानक सुरू झालेल्या पावसाने अनेकांची धांदल उडाली. बाजार पेठेत आलेल्या लोकांची धावपळ झाली. बाजारपेठेत भाजीपाला विक्रेत्यांची तारांबळ झाली. जोरात वारा असल्याने काही ठिकाणी घराचे पत्रे उडाले. वणी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे, शेकडो ट्रॅक्टर आलेले होते. अचानक आलेल्या पावसाने कांदे झाकण्याची धावपळ उडाली तर काही कांद्याचे टॅ्रक्टर भिजले. वणी पिंपळगाव रोडवरील कांदा व्यापार्‍यांचे कांद्यांच्या खळ्यावरती बांधण्यात आलेले जवळपास आठ शेडचे नुकसान झाले असून त्यातील पाच शेड पुर्णता जमिनदोस्त झाले. त्यावेळी कांदा शेड मधील कांदे तसेच काही वाहनांवर शेड पडल्याने नुकसान झाले.

काही कांद्यांच्या खळयात कांदे उघड्यावर असल्याने पावसात कांदा भिजून लांखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अर्धा तास वादळी वारा आल्याने पंचक्रोशितील रस्त्यांवर असलेल्या काही झाडाच्या फांद्यां तुटून रस्त्यावर व विजेच्या तारांवर पडल्याने विजेच्या तारा तुटल्या. वणी – पिंपळगाव रस्त्यावरील पारेगांव फाट्या नजीक विजेचे चार ते पाच खांब पडले आहे. वीज महावितरण कंपनीचे कर्मचारी विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे. या पावसामुळे बाजार पटांगणात लावलेले पाल ही उडाले या मोकळे पटांगण असल्याने माल ठेवण्यास जागा नसल्याने थोड्याफार प्रमाणात भिजला.

यात प्रामुख्याने पिंपळगाव रोड वरील परमानंद किशोर रा. वणी यांचे काद्याची चाळीचे शेड व कांदा असे एकूण 15 लाखाचे नुकसान झाले, वाघेर्‍याच्या डोंगराजवळ असेलेल्या अर्जुन राहाणे रा. सुकेणे यांचे कांद्याचे दोन शेड कोसळले असून शेड सह काद्यांच 40 लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. त्यांच्याच शेड खाली कांदा विक्री करण्यासाठी आलेले 5 ट्रॅक्टर, एक पिकअप, एक छोटा हत्ती, दोन ट्रक यांच्यावर शेड पडून ही खूप नुकसान झालेले आहे.

तसेच मोहसिन मनियार यांचे कांदा शेड व कांदा 90 टन कांदा अंदाजे किमत 15 लाखाचे नुकसान झाले. विजय कुमार ठक्कर यांच्याही शेडचा कागद उडाला असून लाखोंचा कांदा भिजला आहे. अशोक बोरा यांच्या शेडचे पत्रे उडाले असुन त्यांचाही लाखोंचा कांदा भिजला आहे. अतुल पाटील ब्रदर्स खेडगाव 3 लाखांचा कांदा भिजला आहे. नंदुशेठ चोपडा यांचे शेडसह कांद्याचे 20 लाखांचे नुकसान झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या