Monday, May 19, 2025
Homeधुळेखराडवाडीत वादळी पाऊस, 25 घरांचे नुकसान

खराडवाडीत वादळी पाऊस, 25 घरांचे नुकसान

पिंपळनेर Pimpalner । वार्ताहर

- Advertisement -

साक्री तालुक्यातील खराडवाडी (Kharadwadi) येथे काल रात्री दहा वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाट (crack of lightning) आणि वादळीवार्‍यासह (storm) जोरदार पाऊस (Heavy rain) झाला. त्यात 20 ते 25 घरांचे नुकसान (Damage to houses) झाले असून सहा जण (Six people were injured) जखमी झाले आहे. या रहिवाशांचा संसार उघड्यावर आला आहे.

वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे झाडे उन्मळुन पडली आहेत. तर विजेचे खांब देखील कोसळले आहेत. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. गुरे देखील जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिक, महसूल प्रशासन, पंचायत समितीचे मदतकार्य सुरू झाले आहे. जखमींना धुळे जिल्हा रूग्णालयात येथे उपचारासाठी पाठवण्यात आले.

यावेळी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे, सरपंच ज्योती गांगुर्डे, तलाठी एस.एम.कोकणी, ग्रामसेवक व्ही.पी.भदाणे, पोलीस पाटील बानुबाई देशमुख, दहिवेल कार्यालयाचे एएसआय आर्.एस. जाधव, पोलीस कॉन्स्टेबल गुलाब शिंपी, वीज वितरण कंपनीचे महेंद्र थैवील, चेतन देवरे, जितेंद्र गवळी, ज्ञानेश्वर पवार, पितांबर संभाजी यांनी मदतकार्य सुरू केले आहे.

विद्युत पुरवठा तसेच रस्त्याचे काम सुरळीत करण्याचे कामही केले जात आहे. आ. मंजुळा गावित यांनी या घटनेची वेळीच दखल घेऊन मदत करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. दरम्यान गावात रात्री पाऊस झाला. मात्र त्यांची भिषणता सकाळी दिसून आली. गावात घरे, गोठ्यांची पडझड झालेली होती.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठा ट्विस्ट;...

0
नवी दिल्ली | New Delhi पाकिस्तानसाठी (Pakistan) हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरियाणाच्या (Haryana) हिसारमधील ट्रॅव्हल युट्यूबर ज्योती मल्होत्राला (Jyoti Malhotra) अटक करण्यात आली आहे. ज्योतीच्या अटकेनंतर...