नाशिक । Nashik
नाशकातील “स्ट्रेंजर्स” या सामाजिक आशयाच्या महितीपटास “विशेष सामाजिक माहितीपट” प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. या माहितीपटाचे निर्मिती , दिग्दर्शन, लेखन विशाल पाटील यांनी केले आहे.
मुंबई येथील “मनात पाप” माध्यम वाहिनी वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये जगभरातून आलेल्या ३५६ माहितीपटातून “स्ट्रेंजर्स” ची विशेष सिने माहितीपट म्हणून निवड करण्यात आली असल्याचे निर्माते विशाल पाटील यांनी सांगितले.
माध्यमे साधने असतात साध्य नसतात. त्यांचा अतिरेकी वापर बुद्धीवर घाला आहे, इंटरनेटचा वाढता वापर त्यामुळं हरवलेल्या मानसिक कौटुंबिक शारीरिक स्थैर्य व संवाद याचा मानवी जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामांवर भाष्य करणाऱ्या या माहितीपटाचे सर्वच निर्मिती टीम नाशिकची आहे.
निर्माता दिग्दर्शक विशाल पाटील, संकलन वेदांत सौंदानकर, कैमेरामन रुपेश, ध्वनीमुद्रण सुमंत वैद्य, सहाय्यक गणेश गुंजाळ, विशाल पांडे, कलाकार हितेश कारिया, शिल्पा अवस्थी, स्मिता प्रभू, प्रज्ञा गोपाले, स्वाती देशमुख, सोनाली नेवकर, संदेशा पाटील, गणेश गुंजाळ, आबा पाटकर, डॉ भानुदास बेंडके, सुनील नागमोती, सुनील पगारे बालकलाकार अरुष जोशी, आलिशा निमोनकर, स्वरा अमृतकर, झिया, श्रेया, प्रनवं, स्पंदन, श्रुती, पार्थ, ओम असे सर्वजण यात सामील आहेत,