Saturday, May 4, 2024
Homeनगरओढे-नाल्यांवरील अतिक्रमणांचा अहवाल सादर करा

ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणांचा अहवाल सादर करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पाईप टाकून बंद केलेले ओढे तसेच किती ओढे-नाले बुजविले याचा अहवाल सादर करण्याचे आदेश मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे (Municipal Commissioner Dr. Pankaj Jawale) यांनी संबंधीत अधिकार्‍यांना दिले आहेत. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर आयुक्त डॉ. जावळे (Municipal Commissioner Dr. Pankaj Jawale) यांनी शनिवारी महापालिकेत सर्व अधिकार्‍यांची बैठक घेतली.

- Advertisement -

या बैठकीला अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त डॉ. श्रीनिवास कुरे, सहाय्यक आयुक्त सचिन राऊत, नगररचनाकार राम चारठनकर, शहर अभियंता सुरेश इथापे, आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे, उद्यान विभागप्रमुख शशिकांत नजान व प्रभाग अधिकारी उपस्थित होते.

चारही प्रभाग अधिकारी यांनी पाणी अडल्याची ठिकाणे, पाईप टाकून ओढा बंद केलेल्या ठिकाणांची यादी तत्काळ नगररचना विभागास (Town Planning Department) सादर करावी. नगररचना व बांधकाम विभागाने (Town Planning and Construction Department) मनुष्यबळाव्दारे अस्तित्वातील किती नाले बुजविले, याची यादी सादर करावी; तसेच पुन्हा एकदा सर्व्हे पूर्वीच्या ओढ्याचे स्वरूप व आत्ताच्या ओढ्यांची वस्तुस्थिती सादर करावी. अतिक्रमण विभागाने नालेसफाईची संपूर्ण माहिती तत्काळ सादर करावी, घनकचरा विभागाने (Solid Waste Division) केलेल्या नालेसफाईबाबतची माहिती सादर करावी, असे आदेश आयुक्त डॉ. जावळे यांनी दिले.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे शहरात विविध ठिकाणी घरांत पाणी शिरले. आयुक्तांनी या परिस्थितीची पाहणी करून अधिकार्‍यांची बैठक घेत तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडे (Emergency Management Room) तसेच प्रभाग समिती कार्यालय येथे किती कर्मचारी आहेत, साधनसामग्री किती आहे, याची माहिती घेतली.

- Advertisment -

ताज्या बातम्या