नंदुरबार | प्रतिनिधी Nandurbar
जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांपैकी सर्वाधिक नंदुरबार तालुक्यातील असल्याने प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून नंदुरबार शहरात प्रत्येक रविवारी सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.
- Advertisement -
त्यानुसार आज संचारबंदीदरम्यान बाजारपेठ, रस्ते, निर्मनुष्य झाल्याचे चित्र दिसत होत.
सकाळपासूनच ठीककठिकाणी चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
सकाळच्या प्रहरि दूध घेण्यासाठी नागरिकांची लगबग दिसून आली. यावेळी पोलीस दलातर्फे कडक बंदोबस्त लावण्यात आला होत. नंदुरबार शहरात कडक संचारबंदीमुळे बाजारपेठ, रस्ते, निर्मनुष्य झाल्याचे चित्र दिसत होत. या दरम्यान पालीकेतर्फे शहरात फवारणी करण्यात आली.