Saturday, May 4, 2024
Homeराजकीयभाजपविरोधात सशक्त आघाडीसाठी प्रयत्नशील

भाजपविरोधात सशक्त आघाडीसाठी प्रयत्नशील

मुंबई । प्रतिनिधी

देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करणार करून भाजपच्या विरोधात एक सशक्त आघाडी उभी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून येत्या काळात तसे प्रयत्न सुरू होतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

- Advertisement -

निवडणूक रणनीती आखण्यात तज्ज्ञ मानले जाणारे प्रशांत किशोर यांनी काल, शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीतून पवारांनी आगामी राजकीय डावपेचांची चाचपणी केल्याचे बोलले जात आहे. शिवाय आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी बोलताना मलिक यांनी देशातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचीशरद पवार यांची इच्छा आहे. तशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार बंगालमध्ये जाणार होते. मात्र तब्येतीमुळे त्यांना जाता आले नाही. परंतु देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट ते करणार आहेत, असे मलिक म्हणाले.

दरम्यान, पक्षाने प्रशांत किशोर यांच्याकडे कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी भेटीत दिल्याचे मलिक यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार

केंद्रीय किंवा उत्तर प्रदेशमधील मंत्रिमंडळात बदल होवो अथवा ना होवो उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तन होणार हे जनतेने मनात पक्के केले आहे, असेही मलिक म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या