Thursday, September 19, 2024
Homeनगरश्रीगाेंंद्यातून राज्यभर जोरदार गुटखा विक्री, आशीर्वाद कुणाचा?

श्रीगाेंंद्यातून राज्यभर जोरदार गुटखा विक्री, आशीर्वाद कुणाचा?

श्रीगोंदा । प्रतिनिधी

- Advertisement -

श्रीगोंदा तालुक्याचे क्षेत्रफळ मोठे असले तरी दोन पोलीस ठाणे कार्यरत आहेत. असे असतानाही तालुक्यात अवैध धंदे सुरू आहेत. अवैध दारू, जुगार अड्डे, मटका, गांजा, गुटखा विक्री होताना दिसत आहे.

अवैध व्यवसाय करणार्‍यावर पोलिसांचा वचक आहे की नाही?, असा प्रश्‍न नागरिकांना असून तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात गुटखा साठवणुकीसाठी गोडावून असून राज्याबाहेरून हा गुटखा तालुक्यात येत आहे. या गुटख्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी सद्दाम पठाण यांनी केली आहे. पोलीस अधिक्षकांना याबाबत निवेदन दिले आहे.

हे ही वाचा : जिल्ह्यात ‘लाडकी बहीण योजने’साठी तब्बल 7 लाख 8 हजार महिलांचा अर्ज; किती अर्ज ठरले पात्र? आकडेवारी समोर

तालुक्यातील दोन्ही पोलीस ठाण्यांत कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आहेत. तसेच बिटनिहाय नवीन हवालदारांची टीम आहे तसेच स्वतंत्र डीबी शाखा कार्यरत आहे. तपास यंत्रणा सक्षम असली तरी अवैध व्यावसायिकांवर नियंत्रण होताना दिसत नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक कार्यरत असताना गुन्हा घडल्यानंतर ते सक्रीय दिसत आहे.

तालुक्यात गावागावांत हातभट्टी, धाब्यावर देशी-विदेशी दारू, जुगार, गांजा विक्रीसोबतच प्रत्येक टपरीवर मिळणारा मावा, गुटखा सर्रास मिळत आहे. श्रीगोंदा हे गुटखा विक्रीचे मुख्य केंद्र बनले आहे. येथून बीड, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, जालना, पुणे जिल्ह्यात गुटखा पाठवण्यात येत आहे. कर्नाटकामधून थेट श्रीगोंद्यात विविध कंपन्यांचा गुटखा येत आहे. तालुक्यातील वेगवेगळ्यात गावात त्याची साठवणूक करण्यात येत आहे.

हे ही वाचा : Pune Hit And Run : पुन्हा ‘हिट अँड रन’, चारचाकीने दुचाकीस्वाराला…

आशीर्वाद कुणाचा

गावोगावी पानाच्या टपर्‍यांवर पान-सुपारीऐवजी गुटख्याच्या पुड्यांची विक्री होत आहे. चारचाकीमधून शेजारच्या तालुक्यासह पर जिल्ह्यात गुटखा पोहच करणारी मोठी यंत्रणा राबत आहे. गुटखा विक्रीत मोठा पैसा मिळत असल्याने तालुक्यातील गुटखा विक्रीला आशीर्वाद कोणाचा? असा प्रश्‍न पडला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या