Friday, September 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजअफगाणिस्तानमध्ये 6.2 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के

अफगाणिस्तानमध्ये 6.2 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के

दिल्ली, जम्मू-काश्मीरमध्येही जाणवले भूकंपाचे धक्के

- Advertisement -

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

अफगाणिस्तानमध्ये आज शनिवारी सायंकाळी रिश्टर स्केलवर 6.2 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के भारतातील जम्मू-काश्मीर, दिल्ली-एनसीआरसह अनेक भागांत जाणवले. तसेच पाकिस्तान, चीन, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिझस्तान आणि तुर्कमेनिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, आता पर्यंत या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नव्हती. संबंधित देशांतील प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून संभाव्य नुकसानीचा आढावा घेत आहे.

भारतीय राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (National Centre for Seismology – NCS) माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी 7.04 वाजता हा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या ईशान्य भागातील कलाफगान शहरापासून सुमारे 81 किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची खोली सुमारे 215 किलोमीटर असल्याचे नोंदविण्यात आले आहे.

भूकंपाची तीव्रता अधिक असल्यामुळे त्याचे धक्के अनेक देशांमध्ये जाणवले. भारतात विशेषतः जम्मू-काश्मीर आणि दिल्ली-एनसीआर परिसरातील नागरिकांना काही सेकंद धक्के जाणवल्याने अनेकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने घराबाहेर धाव घेतली. काही भागांत नागरिकांनी उघड्या जागेत थांबणे पसंत केले.

ताज्या बातम्या

मराठा समाज दुखावला, एकेरी भाषेत बोलाल तर…; शिंदे गटाच्या नेत्याचा मनोज...

0
धाराशिव । Dharashiv मराठा आरक्षणाच्या तीव्र लढ्याने संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण...