Saturday, May 4, 2024
Homeनगरपाट पाण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवा - विवेक कोल्हे

पाट पाण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवा – विवेक कोल्हे

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांना आदरांजली वाहताना ज्येष्ठ सभासद, पार्लमेंट बोर्ड व कारखान्याच्या निवडणूक बिनविरोध केली. 21 जागेसाठी फक्त 21 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. स्व. शंकराराव कोल्हे यांनी केलेला पाट पाण्याच्या संघर्ष पुढेही सुरूच ठेवावा लागेल. पुन्हा एकदा हक्काच्या पाण्यासाठी लढा उभारावा लागेल, असे प्रतिपादन कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले.

- Advertisement -

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे छत्रपती लॉन्स मध्ये सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याच्या संचालक मंडळांचा सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, साईनाथ रोहमारे, उत्तमराव औताडे, रामनाथ चिने, ज्येष्ठ संचालक आप्पासाहेब दवंगे, विश्वास महाले, बाळासाहेब वक्ते, ज्ञानेश्वर होन, बापूसाहेब बाराहाते, रमेश आभाळे, ज्ञानदेव औताडे, राजेंद्र कोळपे, मनिष गाडे, विलास वाबळे, विलास माळी, सतीश आव्हाड, निवृत्ती बनकर, त्रिंबक सरोदे, उषाताई औताडे, सोनिया पानगव्हाणे, बापूसाहेब औताडे, संजय औताडे, अशोक औताडे आप्पासाहेब औताडे, निखिल औताडे, शंकर औताडे, कचेश्वर रांधव, निवृत्ती औताडे, अमोल औताडे, अजित नवले, काकासाहेब शिंदे, जगन्नाथ औताडे, नवनाथ औताडे, सुखदेव भालेराव, इंद्रभान खुरसणे, रमेश रोहमारे, विलास रोहमारे, प्रकाश रोहमारे उपस्थित होते.

संचालक बाळासाहेब वक्ते यांनी गोदावरी उजव्या व डाव्या कालव्याच्या बाबतीत नेहमीच आपल्या तालुक्यावर अन्याय होत असल्याचे सांगत धरणे शंभर टक्के भरलेले असताना देखील तीनच आवर्तने झाली ही दुर्दैवी बाब आहे. कार्यक्रमाचे नियोजन संचालक ज्ञानदेव औताडे व उषाताई औताडे यांनी केले. सूत्रसंचालन डी.पी. औताडे यांनी केले तर आभार अशोक औताडे यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या