Saturday, May 24, 2025
Homeनगरआधार नंतर आता विद्यार्थ्यांचा ‘अपार’ क्रमांक

आधार नंतर आता विद्यार्थ्यांचा ‘अपार’ क्रमांक

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

- Advertisement -

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आता विद्यार्थ्यांचे अपार (ऑटोमेटेड पर्मनंट कॅडेमिक रेजिस्ट्री) आयडी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या अपार आयडीद्वारे विद्यार्थ्यांना विशेष क्रमांक मिळणार असून विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक प्रवास त्यात साठवला जाणार आहे.

मंत्रालयाच्या शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार यांनी विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याचे निर्देश राज्य सरकाराला दिले आहेत. त्या अनुषंगाने राज्य सरकारने विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याच्या कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा ताण, विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड नोंदणीतील अडचणी संपलेल्या नसताना आता अपार आयडी तयार करण्याचे कामही शिक्षकांवरच लादले जाणार आहे.

केंद्रीय शालेय शिक्षणच्या पत्रात नमूद केलेल्या माहितीनुसार अपार आयडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती डिजिटल पद्धतीने साठवण्यात येणार आहे. ही माहिती हवी तेव्हा ऑनलाईन उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीवर देखरेख करता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकावरूनच पालकांच्या संमतीने अपार आयडी तयार केला जाणार आहे. त्यासाठी संमतीपत्र भरून द्यावे लागणार आहे. अपार आयडीमध्ये साठवली जाणारी माहिती गोपनीय ठेवली जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विचार करता प्रत्येक विद्यार्थ्यांकडे एक स्वतंत्र युनिक आयडी असणे गरजेचे आहे. त्यात अध्ययन निष्पत्ती, परीक्षांचा निकाल, समग्र अहवाल, विद्यार्थ्याने शैक्षणिक उपक्रमात केलेली कामगिरी, क्रीडा, कौशल्य प्रशिक्षण अशी सर्वंकष माहिती असेल.

आधार क्रमांक, स्टुडंट आयडी हे युनिक क्रमांक आहेत. आता नव्याने अपार क्रमांकाची गरज काय, आधार आणि स्टुडंट आयडीचा विदा अधिकृत असताना तो अनधिकृत ठरणार का, असे प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाचा घोळ अद्याप संपलेला नाही. त्याचे शिक्षकांना अतिरिक्त काम करावे लागत आहे. त्यात आता अपारची भर पडणार आहे. ही कामे शिक्षकांवरच का लादली जातात? शिकवणे सोडून अशैक्षणिक कामांनी शिक्षक बेजार झाले आहेत, अपुर्‍या शिक्षक संख्येकडून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा ठेवली जात आहे.

‘अपार’ हे आधार संलग्न असणार आहे. त्यामुळे आधारची सक्ती केली जाईल. आधारची सक्ती करता येणार नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. त्यामुळे आधार सक्तीमुळे या निर्णयाचे उल्लंघन होते. अपार साठी पालकांची संमती घेतली जाणार असली, तरी नकार देण्याची मुभा आहे का? हेही सांगण्याची गरज आहे.

वैतागले शिक्षक

सध्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेपेक्षा आधारकार्ड, यु-डायस, यु-डायस प्लस यासारख्या विविध संकेतस्थळावर माहिती भरणे, शालेय पोषण आहाराची माहिती नोंदवणे, विविध प्रकारचे अ‍ॅप डाऊनलोड करणे, त्याची माहिती भरणे यासारख्या कामांनी शिक्षक पूर्णतः बेजार झाला आहे. आम्हाला शिकवू द्या, असे सांगत शिक्षक आंदोलन करू लागले आहेत. ऑनलाईन माहितीबरोबर ऑफलाईन स्वरूपातील माहिती वारंवार मागण्यात येत आहे. अशा परिस्थितीत शिक्षक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्या आहेत. यामुळे गरिबांचे शिक्षण आणि त्याचा दर्जा ढासळत असल्याचे मत शिक्षक संघटनांनी व्यक्त केले आहे. त्यात आता नव्याने नव्या संकेतस्थळाची भर पडली आहे.

शिक्षक विकारग्रस्त

राज्यात मोठ्या प्रमाणावर शिक्षकांना ऑनलाईन स्वरूपाची कामे करावी लागत असल्याने सतत शिक्षक तणावाखाली येत असल्याची बाब समोर आली आहे. स्क्रीन टाईम वाढत असल्याने शिक्षकांमध्ये चिडचिड त्याचबरोबर विविध विकाराने शिक्षक ग्रस्त झाले आहेत. अनेक शिक्षक मधुमेह, हृद्यविकार यासारख्या अनेक आजारांनी ग्रस्त झाले आहेत. ताणतणाव वाढत असल्यामुळे शिक्षक बढती नाकारत असल्याचेही चित्र आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : घर देण्याच्या नावाखाली साडेसहा लाखांची फसवणूक; भाचे जावईविरोधात...

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) घर घेऊन देतो, असे आमिष दाखवून तब्बल सहा लाख 50 हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी राजेश्‍वर मनोहर भोसले...