Friday, September 25, 2026
Homeनगरराजूर येथे विद्यार्थिनीची छेडछाड

राजूर येथे विद्यार्थिनीची छेडछाड

पालकांमध्ये पसरले भीतीचे वातावरण

राजूर |वार्ताहर| Rajur

शाळा सुटल्यानंतर राजूरपासून जवळच असलेल्या आपल्या घरी जात असलेल्या विद्यार्थिनीची छेडछाड केल्याची घटना शुक्रवारी (दि. 23 ऑगस्ट) दुपारी घडली. सोमनाथ एकनाथ पोटकुले (रा. मान्हेरे, वय 28) असे या घटनेतील आरोपीचे नाव असून राजूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबत राजूर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, की पीडित अल्पवयीन मुलगी राजूर येथील एका विद्यालयात शिकते.

- Advertisement -

घरी जात असताना राजूरजवळच रस्त्यावर तिला सोमनाथ पोटकुले याने अडवले. मी तुला काहीतरी सांगणार आहे, असे त्याने म्हटल्यानंतर तिने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने तिला पकडले आणि रस्त्याखाली झाडीत नेत गैरवर्तन केले. मात्र, ती मुलगी त्याच्या तावडीतून शिताफीने सुटली. रस्त्यावर येऊन तिने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून काही लोक जमा झाले आणि त्यांनी पोटकुले यास पकडले. याबाबत पीडित मुलगी व तिची आई यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी पोटकुले याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे गणित गुंतागुंतीचे

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील 21 जागांसाठी निवडणूक होणार असल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय गणिते पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. दरम्यान,...