Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रदुर्दैवी घटना! गणपतीच्या मिरवणूकीत विजेचा शॉक लागल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

दुर्दैवी घटना! गणपतीच्या मिरवणूकीत विजेचा शॉक लागल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

मुंबई | Mumbai

बुधवारी देशासह संपुर्ण जगात सगळ्यांच्या लाडक्या बाप्पांचे जल्लोषात आगमन झाले. देशात अनेक ठिकाणी बाप्पांच्या आगमनाचा उत्साह पहायला मिळाला. अनेक ठिकाणी लाडक्या गणरायाची वाजत गाजत मिरवणूक काढून स्थापना करण्यात आली. मात्र उडिशामध्ये (Odisha) बाप्पांची मिरवणूक सुरु असताना दुर्दैवी घटना घडली असून शॉक (Electric Shock) लागून एकाचा मृत्यू (Student Death) झाला आहे.

- Advertisement -

ओडिशातील कटक शहरात मंगळवारी गणपती मिरवणुकीवेळी वीजेचा शॉक लागून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत्यू झालेला विद्यार्थी बुलढाण्यातील असून सोहम सावळे असे त्याचे नाव आहे. कटक शहरात एमएससीचे शिक्षण तो घेत होता.

India vs Canada: दोन्ही देशात इकोनॉमिक वॉर; शिक्षणासोबत व्यापारावर होऊ शकतो गंभीर परिणाम

याबाबत मिळालेली माहिती अशी की, ओडिसातील महाविद्यालयात गणपतीची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कऱण्यासाठी आणली जात होती. गणपतीची वाजत गाजत मिरवणूक ट्रॅक्टरमधून काढत होते. तेव्हा मिरवणुकीत ट्रॅक्टरमध्ये उभा राहून तरुण झेंडा फिरवत होता. झेंड्याला असलेली एल्युमिनिअमची काठी ११ केव्हीच्या वीजेच्या तारांना लागली आणि ट्रॅक्टरमधील चार ते पाच जणांना वीजेचा जोरदार झटका बसला.

तीन ते चार विद्यार्थी ट्रॅक्टरवर उभ असताना वीजेचा जोरदार धक्का बसल्याने ट्रॅक्टरवरुन खाली कोसळले. यात सोहम सावळे याचा जागीच मृत्यू झाला. सोहमच्या मृत्यूमुळे बुलढाण्यातील त्याच्या गावी शोककळा पसरली आहे. या घटनेचा व्हिडीओसुद्धा समोर आला असून त्यात क्षणात वीजेचा धक्का बसल्यानंतर तरुण खाली कोसळत असल्याचे दिसत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या