दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न हमखास विचारला जातो. ‘पुढे तुम्ही काय करणार? काही ठरवले आहे का?’ या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना माहितीच असतील असे नाही. त्यांना आवडणार्या गोष्टी आणि करिअरच्या वाटा यात काही संबंध असू शकतो, हेही अनेकांच्या गावी नसते. विद्यार्थ्यांशी पत्राद्वारे गप्पा मारणारे ‘आवड-निवड’ हे नवे सदर.
विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,
मागील लेखात आपण प्रथमेशच्या दादाच्या स्पर्धा परीक्षांविषयी ओझरती माहिती जाणून घेतली. मागील आठवड्यात इयत्ता दहावीचा निकाल लागला आणि प्रथमेशला आठवले की शेजारचा सूरजही दहावीला होता. प्रथमेशची आई म्हणाली, अरे, सूरजला 79 टक्के मार्कस् मिळालेत. ते ऐकतानाच प्रथमेश घराबाहेर पळाला. पण सूरजचा उतरलेला चेहरा पाहून प्रथमेश म्हणाला, काय झाले तुला? इतके छान मार्कस् मिळालेत, तरी तू नाराज आहेस. असे प्रथमेशने म्हणताच सूरज म्हणाला, काही नाही रे, माझा जीवलग मित्र एका विषयात नापास झाला, त्यामुळे वाईट वाटत आहे. सूरजने असे म्हणताच समोरून घरात शिरणार्या प्रथमेशच्या आईने सूरजचे वाक्य ऐकले आणि त्या म्हणाल्या, सूरज, तुला तुझा मित्र नापास झाला म्हणून वाईट वाटणे साहजिक आहे, पण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, हे आपण लहानपणीच शिकलो आहोत. अपयशाला न घाबरता, त्याला पाठ न दाखवता जीवनाची लढाई लढण्यातच खरे शहाणपण आहे. त्यामुळे आज अयशस्वी झालेले युवा उद्याचे यशस्वी नायक होतील, यात शंकाच नाही. अपयशाने खचून न जाता अपयशावर मात करणारे अनेक जण आपल्या आजूबाजूला असतात.
महात्मा गांधी, इंदिरा गांधी, अल्बर्ट आईन्स्टाईन यांसारख्या महान व्यक्तीही अपयशातून यश मिळवूनच यशस्वी झाल्या आहेत. जे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेत त्यांचे हार्दिक अभिनंदन! जे विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले नाहीत परंतु जीवनाच्या लढाईतला पहिला टप्पा त्यांनी यशस्वीपणे पार केला त्याबद्दल आपण त्यांचे मनापासून स्वागत करूया!
आज अशाच काही विद्यार्थ्यांविषयी जाणून घेऊया. जे आयुष्यात कधीतरी परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत. पण कठोर परिश्रम करून यशस्वी झाले आहेत. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण पहिल्या वर्षाच्या कायद्याच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले नाहीत; परंतु महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर होऊन गेले. प्रसिद्ध गीतकार गुलजार गणितात नापास होऊनही अक्षरांचे गणित सोडवून यशाचे शिखर त्यांनी सहज पादाक्रांत केले. आर. के. नारायण इंग्रजी विषयात नापास झालेत नि त्याच भाषेवर प्रभुत्व मिळवून इंग्रजीत लेखन करून लेखक बनले. आर. के. लक्ष्मण कन्नड विषयात नापास होऊन व्यंगचित्रकार म्हणून नावारूपाला आले. व्ही. शांताराम पोस्ट खात्याच्या कारकुनाच्या परीक्षेत नापास होऊनही चित्रपट क्षेत्राचा इतिहास रचण्यात यशस्वी झाले. दादा कोंडके दरवर्षी गणित विषयात नापास होऊनही अभिनय, चित्रपट व प्रेक्षक या त्रिकुटांचे क्षेत्रफळ अचूक काढणारे गणितज्ज्ञच होय. इंद्रजित भालेराव मॅट्रिकला इंग्रजी नापास परंतु काव्याच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली. नागराज मंजुळे नापास झालेत पण चित्रपट क्षेत्रात यशाची पताका फडकावली.
सूरज, प्रथमेश जगभरातल्या अशा अनेक मुला-मुलींनी शालेय जीवनात अपयशाचा सामना करून आपापल्या आवडीच्या क्षेत्रात उत्तुंग झेप घेऊन जीवन यशस्वी केले आहे. शालेय व महाविद्यालयीन जीवनात अपयशी झाले असतानादेखील त्यांनी यशस्वी करिअर केले.
ही सर्व उदाहरणे तुम्हा दोघांना सांगण्यामागचा उद्देश एकच की, जीवनात केव्हाही अपयशाचा सामना करावा लागला तर खचून न जाता जिद्दीने व दुप्पट जोमाने यश खेचून आणण्याचा प्रयत्न करायचा. सूरज, आता तुझ्या मित्रात जिद्द निर्माण करायचे काम तुझे. बरोबर ना!
होय काकू, नक्कीच प्रयत्न करेल. तितक्यात प्रथमेश ओरडला, दे ताली, दोस्ती के लिए कुछ भी। नि दोघे खळखळून हसू लागले. चला तर मग तुम्हीही तुमच्या ओळखीतील नापास मुला-मुलींना प्रेरणा द्या आणि ‘नापास मुलांची गोष्ट’ हे पुस्तक जरूर वाचण्यास सांगा नि तुम्हीही वाचून काढा. तुमचे पुस्तक पुढच्या शनिवारपर्यंत वाचून होताच आपण पुन्हा