Thursday, June 20, 2024
Homeनाशिकयुनिफाईड डीसीपीआरची अभ्यासून अंमलबजावणी

युनिफाईड डीसीपीआरची अभ्यासून अंमलबजावणी

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

- Advertisement -

राज्य शासनाकडून राज्यात नुकतीच लागु केलेली युनिफाईड डीसीपीआर यांचा योग्य पध्दतीने अभ्यास करुन त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी, असा सूर आज (दि.11) झालेल्या कार्यशाळेत नगररचना विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी व्यक्त केला.

शहरातील महाकवी कालिदास कलामंदिरात विभागीय आयुक्त कार्यालय, नगररचना नाशिक विभाग व क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत युनिफाईड डीसीपीआर कार्यशाळेत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, मनपा आयुक्त कैलास जाधव, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मालेगांव मनपा आयुक्त त्र्यंबक कासार यांच्यासह जिल्ह्यातील नगरपरिषद मुख्याधिकारी, नगररचना विभगाचे वरिष्ठ अधिकारी, बांधकाम व्यावसायिक संघटना पदाधिकारी, बांधकाम व्यांयसायिक, वास्तु विशारद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यशाळेत नगर रचना विभागाचे सेवानिवृत्त सहसंचालक प्रकाश भुक्ते यांच्यासह अधिकार्‍यांनी मार्गदर्शन केले.

यात युनिफाईड डीसीपीआरमधील सवलतींची माहिती देतांनाच याची अंमबजावणी करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी क्रेडाईचे राष्ट्रीय सल्लागार जितुभाई ठक्कर, कोषाध्यक्ष अनंत राजेगांवकर, सुनील कोतवाल, नाशिक विभाग नगररचना सहसंचालक प्रतिभा भदाने, क्रेडाई मेट्रो नाशिक अध्यक्ष रवी महाजन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या