Friday, June 13, 2025
Homeनाशिकउपकेंद्रामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सक्षम : आ. पवार

उपकेंद्रामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सक्षम : आ. पवार

कळवण / मोहबारी । प्रतिनिधी | Kalwan / Mohabari

- Advertisement -

ग्रामीण व आदिवासी भागातील जनतेला मोफत आरोग्य सुविधा (Free health care) पुरवण्यासाठी राज्य सरकारकडून (state government) प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health Center) चालवली जात असून

कळवण तालुक्यातील (kalwan taluka) पिंपळे बु. येथे 75 लाख रुपये खर्च करुन सर्व अद्यावत सुविधायुक्त उभारण्यात आलेल्या पिंपळे बु. आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन आमदार नितीन पवार (MLA Nitin Pawar) यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

आयुष्यमान भारत (Ayushyaman Bharat) उपक्रमांतर्गत तालुक्यात 35 ठिकाणी आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू करण्यात आले असल्यामुळे गावागावातील आरोग्य उपकेंद्रात आरोग्य वर्धिनी केंद्र सुरु झाल्यामुळे वैद्यकीय यंत्रणेची नेमणूक झाली आहे. आरोग्य सेवा निश्चितच सक्षम झाली असून आता पिंपळे बु. व परिसरातील आदिवासी बांधवाना (tribal community) विविध आरोग्य सेवांसाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार नितीन पवार यांनी उदघाटनप्रसंगी केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, ए. टी. पवार इंटींग्रेटेड डेव्हलपमेंट संस्थेचे अध्यक्ष ऋषिकेश पवार, विजय शिरसाठ, विजय शिरसाठ, नितीन बोरसे, के. पी. चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नवलसिंग चव्हाण, पी. एम. वाणी, दीपक देशमुख, रविंद्र पवार आदींसह मान्यवर होते. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नवलसिंग चव्हाण यांनी सांगितले की, या उपकेंद्रांतर्गत आयुष्यमान भारत योजनेच्या विविध 13 प्रकारच्या आरोग्य सुविधा रुग्णांसाठी मोफत देण्यात येणार आहे.

यामध्ये तोंडाचा, स्तनाचा, गर्भाशयाच्या कर्करोगावर (Cancer) प्राथमिक निदान, मधुमेह (Diabetes), उच्च रक्तदाब (High blood pressure) याचबरोबरीने लसीकरण (vaccination), मानसिक आरोग्य (Mental health) यावर उपचार तसेच केंद्रात आयुर्वेद (Ayurveda), युनानी, होमेयोपॅथी (Homeopathy), योगा (yoga) उपचार पद्धती अंमलात आणली जाणार असल्याचे सांगितले. या उपकेंद्रात 13 प्रकारच्या आरोग्य सुविधा अंतर्गत प्रसूतिपूर्व प्रसूती सेवा, नवजात अर्भक व नवजात शिशूंना दिल्या जाणारा आरोग्यसेवा,

बाल्यावस्था किशोरवयीन आरोग्य सेवा तसेच लसीकरण कुटुंब नियोजन गर्भनिरोधक व प्रजनन संबंधित आरोग्य सेवा, सामान्य संसर्गजन्य रोगांची बाह्य रुग्ण सेवा, संसर्गजन्य रोग, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, मानसिक आरोग्य तपासणी, प्राथमिक उपचार व आपत्कालीन सेवा, वाढत्या वयातील आजार, योग व आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा यामध्ये समावेश असणार आहे. यावेळी पिंपळे बु. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

बेशिस्त

Nashik News: बेशिस्त पार्किंग, अनधिकृत गाड्या, विक्रेत्यांमुळे शहराचा चेहरा बकाल; आ....

0
नाशिक | प्रतिनिधी शहरातील द्वारका, मुंबई नाका तसेच इतर प्रमुख चौक व रस्त्यांवर दिवसेंदिवस वाढणाऱ्या अतिक्रमणामुळे नाशिक शहराचा चेहरा बकाल होत आहे. बेशिस्त पार्किंग, अनधिकृत...