Saturday, September 14, 2024
Homeनगरवैजापूर : उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना पाच वर्षांपासून शासकीय वाहनच नाही!

वैजापूर : उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना पाच वर्षांपासून शासकीय वाहनच नाही!

वैजापूर । दिपक बरकसे

- Advertisement -

शासकीय कार्यालय, खाजगी वाहन हे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल मात्र हे वास्तव आहे. वैजापूर तालुक्यातील १६३ गावांचा कारभार चालवणाऱ्या महसूल विभागाचे, येथील उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयाला तब्बल पाच वर्षापासून एकही शासकीय वाहन उपलब्ध नसल्याने येथील उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना कुठेही अनुचित प्रकार घडल्यास घटनास्थळी पोहोचण्यासाठी चक्क दुचाकी किवा खाजगी वाहनावर ‘महाराष्ट्र शासन’चे बोर्ड लावून फिरावे लागत असल्याचे विदारक चित्र बघयला मिळत आहे.

तालुक्यात शासकीय कार्यलयातील आढावा घेतला असता जवळपास सर्व विभागाकडे शासकीय वाहनाची सोय आहे. परंतु, १६३ गावांचा महसूली कारभार चालवणाऱ्या कर्मचारी सोडा अधिकाऱ्यांनाच पाच वर्षापासून शासकीय वाहन नाही. तत्कालीन तहसीलदार महादेव किरवले असताना येथे शासकीय वाहन बघयला मिळत होती. मात्र, त्यानंतर जवळपास चार ते पाच उपविभागीय अधिकारी व तहसीलदार बदली झाले. मात्र एकालाही शासकीय वाहन उपलब्ध झाले नाही. एक महीनापूर्वी येथे उपविभागीय अधिकारी अरुण जरहाड व तहसीलदार सुनील सावंत रुजू झाले आहे. परंतु त्यांना शासकीय वाहन उपलब्ध झाले नसल्याने जरहाड सुद्धा आता शासकीय कामासाठी स्वताची खाजगी वाहनाचा वापर करताना दिसत आहे. नव्याने रुजू झालेले तहसीलदार सुनील सावंत यांना केवळ दुचाकी आहे. चारचाकी वाहन त्यांच्याकडे नसल्याने त्यांना शासकीय कामासाठी पुरवठा विभागातील बहुरे यांच्या वाहनाची किवा दुचाकीवर फिरावे लागते. याच दुचाकिवर सावंत यांनी दहा दिवसापूर्वी फिल्मी स्टाइल शिवना नदित मध्यरात्री अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनावर धाडी टाकले होते. दरम्यान,शासकीय वाहनासाठी जर अधिकाऱ्यांची ही अवस्था असेल तर नायब तहसीलदार व कर्मचाऱ्याना तालुक्यात शासकीय कामासाठी किती अडचणी येत असेल हा सर्वासाठी संशोधनाचा विषय आहे.

औषध फवारणी करताना अंगावर विजेची तार पडून शेतकरी ठार, दोघे जखमी

३ वर्षात १५ लाख भाडे…

मागील ३ ते ४ वर्ष तत्कालीन तहसीलदार यांनी शासकीय कामासाठी एक खाजगी वाहन ठेवले होते.दरम्यान,तिन वर्षात या एकच वाहनाचा भाडा तब्बल १५ लाख रुपये झाल्याने आता भाडयावरुन अधिकारी व वाहन मालकांचा वाद थेट जिल्हाधिकारीच्या कोर्टात सुरु आहे.

खाजगी वाहनाचा गैरवापर…

अनेकवेळा अधिकाऱ्यानी ज्या खाजगी वाहनाचा वापर केला त्याच वाहनाचा रात्रीच्या सुमारास गोदावरी व शिवना नदी पात्रात त्यांचा वापर करून तहसील मधील काही खाजगी कर्मचाऱ्यानी वाळू माफियाना गाडीत साहेब बसलेले आहे, अशी धमकी भरून कारवाई करयाची की तोडीपानी करायची असे सांगून कारवाईच्या नावावर खुलेआम हफ्तेवसूली केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहे.

शासकीय वाहन नसल्याने अनेक अडचणी निर्माण होतात मि नव्याने येथे रुजू झालो आहे. शासकीय वाहन लवकर मिळावे यासाठी पत्र व्यवहार केले आहे.

सुनील सावंत,तहसीलदार

- Advertisment -

ताज्या बातम्या