अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
व्यसन करून कोणी व्यापार्यांना त्रास दिल्यास संबंधित व्यक्तीची माहिती तात्काळ कोतवाली पोलिसांना द्या, संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करू, व्यापार्यांना जबरदस्तीने वर्गणीच्या नावाखाली कोणी पैशाची मागणी करीत असेल तर संबंधितांवर खंडणीचे गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक यादव यांनी दिला.
विरोधकांना आम्ही तिघे संताजी-धनाजीसारखे दिसतो
कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील मार्केट यार्ड पोलीस चौकी सुशोभित करून पुन्हा सुरू करण्यात आली असून त्याप्रसंगी पोलीस निरीक्षक यादव यांनी व्यापार्यांशी संवाद साधला. यावेळी राजेंद्र बोथरा, अविनाश घुले, गोपाल मणियार, अशोक लाटे, अमोल पोखरणा, विजय कोथिंबीरे, विशाल पवार, पोलीस उपनिरीक्षक अश्विनी मोरे, पोलीस अंमलदार योगेश खामकर, मच्छिंद्र पांढरकर आदी उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली मार्केट यार्ड परिसरातील पोलीस चौकी निरीक्षक यादव यांनी सुरू केली आहे.
मी पुन्हा येईनची दहशत आद्याप कायम
मार्केट यार्ड बीट करीता नेमलेले अधिकारी आणि पोलीस अंमलदार हे चौकीमध्ये बसूनच कामकाज पाहतील. नागरिकांना सहजासहजी उपलब्ध राहतील. दरम्यान, व्यापार्यांनी परिसरात किरकोळ चोर्यामार्या बाबत व इतर मुद्द्यांवर माहिती पोलीस निरीक्षक यादव यांना दिली. त्यावर मार्केट यार्ड परिसरात रात्रीची गस्त अधिक प्रभावी करणार व कोणी त्रास देत असेल तर त्यांचाही बंदोबस्त करू असे आश्वासन यादव यांनी दिले.
वाळूची चोरटी वाहतूक करणारा डंपर उलटून एक जण ठार
मार्केट यार्ड मध्ये कॅमेरे बसविणार
व्यापारी वर्गाच्या सुरक्षेसाठी मार्केट यार्ड परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, असे आवाहन निरीक्षक यादव यांनी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत मार्केट यार्ड परिसरात लवकरच वर्गणी गोळा करून कॅमेरे बसविण्यात येतील असे व्यापार्यांनी सांगितले. व्यापारी अमोल पोखरण यांनी स्वतःहून मार्केट कमिटी परिसरात पाच कॅमेरेच्या संच देण्याचे मान्य केले.
आरोग्य कर्मचार्याची 45 हजाराची फसवणूक; गुन्हा दाखल