Friday, June 21, 2024
Homeनाशिक३५० फुट दरीत असलेला मृतदेह बाहेर काढण्यात यश

३५० फुट दरीत असलेला मृतदेह बाहेर काढण्यात यश

इगतपुरी । Igatpuri

- Advertisement -

कसारा जवळील ५०० फूट खोल दरीत पडलेल्या महिलेस शोधण्यास अखेर यश आले आहे. आपत्ती व्यवस्थापन टीम शहापूर व रेस्क्यू टीम नाशिक यांच्या तब्बल पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर यश आले आहे. गीता अशोक वीर असे मयत महिलेचे नाव आहे.

दरम्यान इगतपुरी तालुक्यातील मानवडे गावातील महिलेने कसारा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या माईनदरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना काल घडली होती.

त्यानुसार कसारा व इगतपुरी पोलीस ठाण्याच्या सरहद्दी वर असल्याने दोन्ही पोलीस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचारी यांनी मयत महिलेच्या पती ने दिलेल्या फिर्यादी नुसार तपास सुरु केला. परंतु मृतदेह ५०० फूट खोल दरित असल्याने तो काढणे शक्य नव्हते. म्हणून आपत्ती व्यवस्थापन टीम शहापूर व नाशिक रेस्क्यू टीम ला पाचारण केले.

बुधवारी सकाळी आठ वाजता दोन्ही टीमने नियोजन करीत माईनदरीत सर्च सुरु केले.. ट्रेक व रोप साहित्य च्या मदतीने काही सदस्य दरीत उतरले तर काही सदस्यांनी पूर्ण माईनदरीचा कडा सर्च करीत मृतदेह बाहेर काढण्यासाठी नियोजन केले.

तब्बल पाच तासाच्या अथक परिश्रमा नंतर मृतदेह शोधण्यास टीम ला यश आले. ३५० फुटावर एका कपारीत अडकून बसलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या