Wednesday, May 22, 2024
Homeनाशिकनाशिक जिल्ह्यात सफरचंद लागवडीचा यशस्वी प्रयोग

नाशिक जिल्ह्यात सफरचंद लागवडीचा यशस्वी प्रयोग

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मविप्र संस्थेच्या दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या चाचडगाव, ता.दिंडोरी येथील प्रक्षेत्रावर हरमन 99 या काश्मिरी सफरचंद प्रजातीची लागवड करण्यात आली असून सफरचंद लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे.

- Advertisement -

कोकणगाव येथील प्रक्षेत्रावर सफरचंदासोबतच अननस, आंब्याच्या सात प्रकारच्या जाती, जायफळ, कोकम, दालचिनी, नारळाच्या विविध जाती, लेमन ग्रास, फणस, पेरू, लिंब व इतर वनस्पतींची देखील प्रयोगशील लागवड महाविद्यालयाच्या वतीने केलेली असून तो प्रयोग देखील यशस्वी होण्याच्या मार्गावर असून त्यासाठी सिंचन पद्धतीचा वापर केला आहे. त्यामध्ये आंतरपिके देखील घेतली जातात. तसेच या ठिकाणी रोपवाटिका देखील उभारलेली असून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तज्ञ मार्गदर्शकांची मदत घेऊन शेतीचा विकास सुरु आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

महाविद्यालयाचे जिल्हाभरातील शेतकरी सभासद व हितचिंतक यांच्याकडून या यशस्वी प्रयोगाबद्दल कौतुक होत असल्याची माहिती संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड.नितीन ठाकरे, उपसभापती देवराम मोगल, शिक्षणाधिकारी डॉ अजित मोरे व प्राचार्य डॉ आय बी चव्हाण यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या