Tuesday, November 26, 2024
Homeधुळेधडावेगळे शीर करून हत्या करणाऱ्या संशयीतास अटक

धडावेगळे शीर करून हत्या करणाऱ्या संशयीतास अटक

धुळे – प्रतिनिधी dhule

शहरातील मोहाडी पोलिस (police) ठाणे हद्दीतील अवधान शिवारात काल अत्यंत क्रुरपणे तरूणाची हत्या करण्यात आली. या गुन्ह्याचा बारा तासांच्या आतच पोलिसांची छडा लावला. स्थानिक गुन्हे शाखेच्या (lcb) पथकाने औरंगाबादमधून (aurangabad) एका संशयीताला अटक केली. अटक केलेल्या चेतन गुजराथी असे नाव आहे. तर मोहाडी पोलिसांनी देखील दुसरा संशयीत विधिसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले. बहिणीबाबत उलट सुलट बोलून तिची बदनामी करीत असल्याच्या रागातुन सतीश मिस्तरी याचा खून केल्याची कबुली गुजराथी याने दिली आहे.

- Advertisement -

हत्यारे घेवून धुळ्याकडे येणारी टोळी गजाआड

जलदगतीने तपास

या गुन्ह्याचा जलदगती तपासाबद्दल पोलिस अधिक्षक संजय बारकुंड यांनी स्थानिक गुन्हे शाखा व मोहाडी पोलिस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचार्‍यांचे कौतूक केले.

अवधान शिवारातील नितीन चौधरी यांच्या पडीत शेतात काल दि. 23 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शिर नसलेला एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. तरुणाच्या निर्घूण खूनाच्या घटनेने प्रचंड खळबळ उडाली होती. घटनेनंतर पोलिस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक ऋषीकेश रेड्डी, पोलिस उपअधिक्षक संभाजी पाटील, एलसीबीचे पोलिस उपनिरीक्षक योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी हे घटनास्थळी दाखल झाले होते.

चौकशीत सतीश बाबू मिस्तरी (वय 22 रा.शिवानंद कॉलनी, मोहाडी) असे त्या मयत तरुणाचे नाव निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिस अधिक्षकांच्या आदेश आणि मार्गदर्शनानुसार मोहाडी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. घटनास्थळावर मिळून आलेले पुरावे, गोपनिय माहिती आणि तांत्रिक विश्‍लेषणाच्या आधारे स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने संशयीतांची माहिती काढली. त्यानंतर दंडेवाला बाबा नगर मोहाडी उपनगर येथे राहणार्‍या चेतन प्रताप गुजराथी (वय 21) याला औरंगाबाद येथे जावून शिताफीने ताब्यात घेतले. तसेच मोहाडी पोलिसांनी या गुन्ह्यातील दुसरा संशयीत अल्पवयीन युवकाला ताब्यात घेतले. मयत सतीश मिस्तरी हा संशयीत चेतन गुजराथी याच्या बहिणीबाबत उलट सुलट बोलत होता, त्या रागातून सतीशचा निर्घुण खून केल्याची कबुली दोघांनी चौकशीत दिली आहे. अशी माहिती पोलिस अधिक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हत्यारे घेवून धुळ्याकडे येणारी टोळी गजाआड

यांची यशस्वी कामगिरी

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सह पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, मोहाडी पोलिस ठाण्याचे सपोनि भुषण कोते, पोसई योगेश राऊत, पोसई बाळासाहेब सुर्यवंशी, पोसई हेमंत राऊत, असई संजय पाटील, पोहेकॉ प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, पोना योगेश चव्हाण, राहुल सानप, कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी, श्रीशैल जाधव, सुनिल पाटील, अमोल जाधव, कैलास महाजन तसेच मोहाडी पोलिस ठाण्याचे असई शाम निकम, पोना किरण कोठावदे, बी.एस.माळी, जे.ए.चौधरी, जे.सी.वाघ, एम.एन.मोरे, डी.जी. गवते, आर.व्ही. गुंजाळ, एम. एस. जाधव, बी.बी. पाटील, जयेश पाटील व चेतन माळी यांनी केली आहे.

हत्यारे घेवून धुळ्याकडे येणारी टोळी गजाआड

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या