Friday, May 16, 2025
Homeजळगावबहादरपुर येथील बद्रीनारायण भगवान यात्रोत्सवाची जय्यत तयारी!

बहादरपुर येथील बद्रीनारायण भगवान यात्रोत्सवाची जय्यत तयारी!

पारोळा – प्रतिनिधी parola

- Advertisement -

तालुक्यातील बहादरपूर (Bahadarpur) येथील श्री बद्रीनारायण मंदिर संस्थान (Sri Badrinarayan Temple) येथील बद्रीनाथ भगवान यांचे वार्षिक यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले असून दि.६ ते १० नोव्हेंबर या दरम्यान सदर यात्रा उत्सव पार पडणार असून यात्रोत्सवाची जय्यत तयारी झाली आहे, भाविकांनी यात्रोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीक्षेत्र बद्रीनारायण मंदिर संस्थान बहादरपुर यांनी केले आहे.

यात्रोत्सवा दरम्यान दि.6 नोव्हेंबर रविवारी वहनाची मिरवणूक सायंकाळी सात ते तीन वाजे दरम्यान होईल, दिनांक सात रोजी दुपारी बारा ते आठ रथाची मिरवणूक निघणार आहे,

Visual Story प्राजक्ताच्या या हटके फोटोशूटने केले घायाळ…

आठ नोव्हेंबर रोजी पालखीची मिरवणूक सकाळी सात ते पाच वाजेपर्यंत तर रात्री साडेनऊ वाजता राकेश महाराज अग्निहोत्री तळोदा यांचे नारदीय कीर्तनाचा कार्यक्रम होईल, तसेच दुपारी तीन ते सहा वाजे दरम्यान कुस्त्यांची दंगल हा कार्यक्रम होणार आहे.

दि.9 नोव्हेंबर रोजी दुपारी 11 ते 5 दरम्यान महाप्रसाद वाटप तसेच रात्री साडेनऊ वाजता ह भ प राजेंद्र उपासनी निजामपूरकर यांचे नारेदीय कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून दिनांक 10 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता राकेश महाराज अग्निहोत्री तळोदा यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.

तरी या धार्मिक कार्याच्या व बद्रीनाथ भगवान यांचे दर्शनाच्या तालुक्यासह जिल्ह्यातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री बद्रीनारायण मंदिर संस्थान श्रीक्षेत्र बहादरपुर यांनी केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi : ना. विखेंच्या अध्यक्षतेखाली साई संस्थानच्या व्यवस्थापनासाठी प्रशासकीय समिती स्थापन

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या व्यवस्थापनाचे नियंत्रण आणि कार्यान्वयन अधिक प्रभावीपणे होण्यासाठी राज्य शासनाकडून प्रशासकीय समिती स्थापन करण्यासाठी साईबाबा संस्थानला कळवण्यात आले...