Sunday, June 23, 2024
Homeजळगावजळगाव महापालिकेची एैसी कहाणी दोन दशकांची पूर्ती तरीही नागरीकांच्या डोळ्यात आणि पाणी...

जळगाव महापालिकेची एैसी कहाणी दोन दशकांची पूर्ती तरीही नागरीकांच्या डोळ्यात आणि पाणी…

भूषण श्रीखंडे । जळगाव jalgaon

- Advertisement -

आशिया खंडात नावाजलेली 17 मजली इमारतीत जळगाव नगरपालिकेचा (Jalgaon Municipal Corporation) कारभार मार्च 2003 मध्ये सुरवात झाली. त्यानंतर नगरपालिकेचे रुपांतर महानगरपालिकेत होवून तब्बल महापालिकेने दोन दशकांची (completion of two decades) अखेर पुर्ती करीत 21 मार्च रोजी 21 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. मात्र गेल्या 20 वर्षात महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांंकडून जळगाव शहराचा मुलभूत विकास व्हायला हवा होता. मात्र तो पाहिजेे त्या प्रमाणात झालेला नाही. त्यामुळे नागरिकांच्या पदरी नागरी सुविधा बाबात उपेक्षाच वाटेला आलेली आहे. खुंटलेला या विकासाला येणार्‍या काळात गती देण्याचे काम पुढील मनपातील पदाधिकारी व अधिकार्‍यांकडून मिळेल अशी आशा जळगावकरांकडून व्यक्त होत आहे.

जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या बाजुला असलेल्या जागेवर जळगावची नगरपरिषदेची इमारतीमध्ये कारभार सुरू होता. त्यानंतर जळगाव महानगरपालिकेची दि.21 मार्च 2003 रोजी स्थापना झाली आणि पहिल्या महापौर म्हणून आशा दिलीप कोल्हे तर उपमहापौर म्हणून अब्दुल करीम सालार यांना पहिला मान मिळाला. त्यानंतर 20 वर्षात 17 महापौर तर 12 उपमहापौर व 20 स्थायी समिती सभापतींनी या महापालिकेचा कारभार पाहिला. यादरम्यान हुडकोच्या कर्जामुळे मनपा कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली होती. त्यामुळे महापालिकेने अनेक चढ-उतार पाहिले. परिणामी महानगरपालिकेडून जळगाव शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यास असमर्थ ठरली. तरीही सहनशिल जळगावकरांनी उद्रेक न करता महापालिका प्रशासनाला सहकार्य केले. आता महापालिका कर्जमुक्त झाली असून आता विकास कामांच्या नविन दिशेने वाटचाल करीत असून नागरिकांच्या अपेक्षा महापालिका प्रशासन व पदाधिकार्‍यांकडून उंचावलेल्या आहेत.

प्रशासकीय कामकाजातही बदल

जळगाव महापालिका मंगळवारी 21 व्या वर्षात पदार्पण करत आहे. बदलत्या युगात जळगाव महापालिकेच्या कामकाजातदेखील बदल झालेला असून आधी कागदांवर होणारे कामकाज आता मनपातील अनेक विभागांमध्ये ऑऩलाईन व संगणीकृत झालेला आहे. यात नगररचना विभाग, प्रकल्प विभाग, जन्म-मृत्यू विभागातील नोंद व दाखले आदी कामकाज हे ऑनलाईन झाले आहे. आता स्मार्ट वर्कच्या दिशेने मनपाचा कारभाराकडे वाटचाल सुरू आहे.

नविन विकास कामांमुळे होणार कायापालट

जळगाव शहरात महानगरपालिकेच्या माध्यमातून जळगाव शहराला पाणीपुरवठा केली जाणारी जलवाहिनी जूनी झाली होती. आता केंद्र व राज्यशासनाच्या मदतीने अमृत योजनेंतर्गत नविन जलवाहिनी टाकण्याचे काम अंतिम टप्यात आहे. त्यामुळे जळगावरांना 24 तास पाणी मिळणार आहे. त्याचसोबत भूमीगत गटारी, मल्लःनिसारण वाहिनी, सांडपाणी शुध्दीकरण केंद्र, घनकचरा प्रकल्प अश्या नविन विकास कामांना देखील गती मिळणार आहे. तसेच शहरात विविध विकास कामे सुरू असून या नविन विकास कामांमुळे जळगाव शहर विकासाकडे वाटचाल करीत आहे.

मनपावर अडचणींचा डोंगर

हुडकोकडून घेतलेल्या कर्जामुळे मनपाला दरमहिन्याला 3 कोटी तर जिल्हा बँकेला सव्वा कोटीचा हप्ता द्यावा लागत होता. त्यामुळे शहरातील विकास कामांवर याचा परिणाम झाला. तसेच 2012 पासून महापालिकेच्या मालकीच्या संकुलातील गाळेधारकांचा प्रश्न, त्यांच्याकडील थकबाकी ही काही प्रमाणात वसुल झाली. परंतु अजून ही गाळ्यांचा प्रश्न सुटलेला नाही. तसेच मनपाचे अर्धवट घरकुले, मनपातील सेवानिवृत्त कर्मचारी संख्या, मनपातील कमी मनुष्यबळ, आकृतीबंध, कर्मचार्‍यांचे पेंशन आदी अनेक अडचणींचा डोंगर मनपावर आजही उभा आहे.

असे लाभले उपमहापौर

महापालिकेचे प्रथम उपमहापौर अब्दुल करीम सालार, द्वितीय रमेश जैन, भारती सोनवणे, राखी सोनवणे, अनिल वाणी, मिलींद सपकाळे, डॉ.सुनिल महाजन, ललित कोल्हे, गणेश सोनवणे, डॉ.अश्विन सोनवणे, सुनिल खडके तर विद्यामन कुलभूषण पाटील हे उपमहापौर पदावर कार्यरत आहे.

मनपाचे प्रथम आयुक्त द.प. मेटके

जळगाव महानगरपालिकेची स्थापना झाल्यावर तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. संजय मुखर्जी यांच्याकडे महापालिकेचे प्रशासक म्हणून जबादारी देण्यात आली होती. त्यानंतर शासनाने आयुक्त द.प. मेटके यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर गेल्या वीस वर्षात अनेक आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे मनपाची जबाबदारी देण्यात आली. सध्या आयुक्तपदाची धुरा डॉ. विद्या गायकवाड यांच्या खांद्यावर आहे.

यांनी भूषविले महापौर पद

जळगाव महानगरपालिकेचे प्रथम महापौर आशाताई दिलीप कोल्हे, द्वितीय तनुजा तडवी त्यानंतर रमेश जैन, प्रदिप रायसोनी, अशोक सपकाळे, सदाशिव ढेकळे, विष्णू भंगाळे, जयश्री धांडे, किशोर पाटील, राखीताई सोनवणे, नितीन लढ्ढा, ललित कोल्हे, प्रभारी महापौर गणेश बुधो सोनवणे, सिमाताई भोळे, प्रभारी महापौर डॉ. अश्विन सोनवणे, भारती सोनवणे आदींनी महापौर पद भूषविले. सध्या विद्यामान महापौर जयश्री महाजन या भूषवित आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या