Monday, July 22, 2024
Homeजळगावसणाच्या दिवशी तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

सणाच्या दिवशी तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव । Jalgaon । प्रतिनिधी

- Advertisement -

गुढीपावडव्याच्या दिवशी पत्नी कामाला गेली असल्याने घरी एकट्याच असलेल्या दत्तू नामदेव चौधरी (वय-38) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील कांचन नगर परिसरात दत्तू चौधरी हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून रिक्षा चालवून ते कुटुंबियांचा उदनिवाृळ करीत होते. गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांची पत्नी दुपारी लहान मुलीला घेवून केटरर्सच्या कामासाठी गेल्या होत्या. तर मुलगा हा गल्लीत मुलांसोबत खेळत होता. याचवेळी दत्तू चौधरी घरी एकटेच होते.

त्यांनी घराचा दरवाजा बंद करुन त्यांनी गॅस सिलेंडरवर उभे राहून घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. त्यांचा मुलगा घरी आला असता त्याचे वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.

घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुबारक तडवी, अभिजीत सैंदाणे व किरण वानखेडे यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. त्यानंतर चौधरी यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल केला. दत्तू चौधरी यांच्या पश्चात पत्नी मोनाली, मुलगा निखील व मुलगी परि असा परिवार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या